रिलायंस जिओचा सेल्युलरनंतर आता फायबर ब्रॉडबँड मार्केटमध्येही आपले पाय घट्ट रोवण्याच्या प्रयत्न आहे. पहिल्या वर्षी 50 मिलियन म्हणजेच ५ कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे. पण, अनेक युजर्स ‘प्रिव्ह्यू ऑफर’चा लाभ घेवून लोकल इंटरनेट सर्व्हिस पुरवणाऱ्यांकडे वळतायेत. याचं मोठं कारण म्हणजे ब्रॉडबँड प्लॅनमध्ये दिलेले FUP लिमिट आहे. पण, आता तुम्ही एका ट्रिकद्वारे कमी किंमतीत महिन्याभराच्या प्लॅनपेक्षा 10 पट अधिक डेटा मिळवू शकतात.
कंपनीने नुकताच आपल्या 199 रुपयांच्या weekly प्लॅनमध्ये बदल केलाय. 199 रुपयांच्या या प्लॅनची वैधता सात दिवसांची असून यामध्ये ग्राहकांना 1TB (1000 जीबी) डेटा मिळतो. FUP लिमिट संपेपर्यंत डेटा स्पीड 100Mbps असतो, पण त्यानंतर स्पीडमध्ये घट होते आणि 1Mbps चा इंटरनेट स्पीड मिळतो. म्हणजेच जर हा प्लॅन तुम्ही पाच वेळेस वापरला तर 35 दिवसांसाठी तुम्हाला तब्बल 5TB डेटा मिळेल. यापूर्वी या प्लॅनमध्ये 100 जीबी डेटा मिळायचा.
आणखी वाचा – (Kia ची जबरदस्त ‘क्रेझ’, Seltos ठरली एक नंबर SUV)
आणखी वाचा -(देशातील 10 सर्वाधिक Popular Cars , ‘ही’ ठरली बेस्ट ; बघा संपूर्ण यादी)
उदाहरण द्यायचं झाल्यास, जर एखादा युजर 1,299 रुपयांचा (18 टक्के जीएसटी वगळून) मंथली प्लॅन घेत असेल तर त्याला 250 Mbps स्पीडसह पहिल्या सहा महिन्यांपर्यंत 750 जीबी डेटा मिळतो. 6 महिन्यांनंतर डेटा लिमिट 500 जीबी होते. पण, तुम्ही 199 रुपयांचा weekly प्लॅन घेतल्यास 35 दिवसांसह करासहीत एकूण 1,170 रुपये भरावे लागतील आणि यामध्ये तुम्हाला तब्बल 5000 जीबी डेटा वापरण्यास मिळेल. म्हणजेच महिन्याभराच्या प्लॅनपेक्षा 10 पट अधिक डेटा मिळेल. त्यामुळे जर तुम्हाला 100Mbps चा स्पीड योग्य वाटत असेल तर या ट्रिकचा वापर करुन तुम्ही अधिक डेटाचा लाभ घेवू शकतात.
आणखी वाचा -(Mahindra चा जलवा! सिंगल चार्जमध्ये तब्बल 520 Km धावणार , 5 सेकंदात 100 चा स्पीड)
आणखी वाचा – (मारुतीची ‘रावडी’ SUV! पहिली झलक दिसताच चर्चांना उधाण)