scorecardresearch

चहा गाळल्यानंतर उरलेल्या पावडरने दूर होऊ शकतात Dark Circle; वापरण्याची ‘ही’ पद्धत एकदा जाणून घ्या

Tea Leaves Benefits for Skin: चहा केल्यानंतर पावडर फेकून देताय? तर त्याचा होणारा वापर एकदा जाणून घ्याच..

चहा गाळल्यानंतर उरलेल्या पावडरने दूर होऊ शकतात Dark Circle; वापरण्याची ‘ही’ पद्धत एकदा जाणून घ्या
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

डोळ्यांखाली डार्क सर्कल येणे ही सामान्य गोष्ट आहे. या समस्येला अनेक कारणे जबाबदार आहेत. उशिरा झोपणे किंवा जास्त झोपणे, लपटॉप किंवा संगणकावर बराच वेळ काम करणे, मानसिक किंवा शारीरिक ताण, वेळेवर झोप न लागणे यामुळे तुमची त्वचा निस्तेज होते ज्यामुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल दिसतात. व्हिटॅमिन ई च्या कमतरतेमुळेही डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू शकतात.

मेडिकल न्यूज टुडेच्या मते, अनेक वेळा डोळ्यांखाली डार्क सर्कलची समस्या अनुवांशिक किंवा वृद्धत्वामुळे देखील येते. हार्मोन्समधील बदल, धुम्रपान यामुळे देखील डोळ्यांखाली डार्क सर्कल येऊ शकतात. डार्क सर्कल दूर करण्यासाठी घरगुती उपाय खूप प्रभावी ठरू शकतात.

त्वचेसाठी चहाच्या पानांचे फायदे

चहाची पाने शरीरासाठी नैसर्गिक अँटिऑक्सिडंट असतात. त्वचेवर अँटिऑक्सिडंट्स आणि कॅफिनचा वापर त्वचा निरोगी आणि तरुण बनवण्यासाठी प्रभावी ठरतो. डार्क सर्कलला दूर करण्यासाठी चहाच्या पानांचा वापर खूप प्रभावी ठरतो. डोळ्यांखालचे डार्क सर्कल दूर करण्यासाठी चहाची पाने अंडर आय क्रीममध्ये मिसळून डोळ्यांखाली रात्रभर राहू द्या, याने डार्क सर्कल दूर होतील.

चहाच्या पानामध्ये असलेले अँटी-एजिंग, अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म त्वचेच्या मृत पेशी काढून टाकतात आणि चेहऱ्यावर चकाकी आणतात. चहाच्या पानांचा स्क्रब लावल्याने डार्क सर्कल दूर होतात. चहाच्या पानांचा स्क्रब चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल नियंत्रित करतात. यामुळे चेहऱ्यावरील मुरुमांपासून सुटका होते .

त्वचेवर चहाची पाने कशी वापरावी

त्वचेवर चहाची पाने वापरण्यासाठी, त्यांना धुवा आणि उन्हात वाळवा. चहाची पाने कोरडी झाल्यावर त्यात १ चमचा मध मिसळा आणि डोळ्याभोवती लावा. काही वेळाने डोळे धुवा, तुम्हाला डोळ्यांवर लगेच फरक दिसेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-01-2023 at 11:00 IST

संबंधित बातम्या