भारतातील विश्वसनीय युरोपियन ब्रँड रेनो या फ्रेंच मोटार कंपनीची Renault Triber  ही कॉम्पॅक्ट एमपीव्ही (मल्टी पर्पज व्हेइकल) कार काही दिवसांपूर्वीच भारतात लाँच झाली. केवळ पेट्रोल इंजिन प्रकारात ही कार भारतीय बाजारात उतरवण्यात आली असून ४.९५ लाख ते ६.४९ लाख रुपयांदरम्यान (एक्स-शोरुम) या कारच्या चार व्हेरिअंटची किंमत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही सात सीटर कार चार मीटरपेक्षा कमी लांबीची आहे. रेनो ट्रायबर हे आकर्षक डिझाइन असलेले दणकट, संक्षिप्त, ऐसपैस जागा असलेले, मॉडय़ुलर वाहन आहे, ज्यामध्ये चार मीटरहून कमी जागेत सात व्यक्ती सहज बसू शकतात. यामुळे रेनोची ट्रायबर या श्रेणीत गेम चेंजर ठरणार आहे. ट्रायबर हे आधुनिक, प्रशस्त तरीही संक्षिप्त, अल्ट्रा-मॉडय़ुलर, इंधनाची बचत करणारे वाहन आहे, ज्यामध्ये आकर्षक इंटेरिअरसह अनेक आधुनिक आणि वैशिष्टय़े आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renault launches 7 seater triber know its price specifications and seat layouts sas
First published on: 02-09-2019 at 16:24 IST