आपल्या आराध्या देवासमोर रोज पूजा करण्यासाठी वेगवेगळ्या अशा सुगंधी अगरबत्तींचा वापर आपण करतो. पण, हीच अगरबत्ती आपल्या आरोग्याला धोकादायक आहे हे तुम्हाल माहित आहे का? दररोज अगरबत्ती लावणा-या घरांमधील हवा प्रदूषित होते. त्यामुळे फुप्फुसांच्या पेशींना सूज येऊ शकते.
उत्तर कॅरोलिना विद्यालयातील गिलिंक्स स्कूल ऑफ ग्लोबल पब्लिक हेल्थमध्ये झालेल्या अभ्यासक्रमानुसार, अगरबत्ती जाळल्याने कार्बन मोनोक्साई़डसारख्या प्रदूषण वाढवणा-या वायूचे उत्सर्जन होते. तसेच, दमा हा आजार असलेल्यांना अगरबत्तीच्या वासाने आणि धुराने त्रास होतो. जगभरात श्वसन रोगांमुळे दरवर्षी जवळपास १० लाख लोकांचा मृत्यू होतो. याचे मुख्य कारण स्वयंपाकासाठी वापरण्यात येणा-या स्टोव्हमधून निघणारे प्रदूषणकारक गॅसेस हे आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 18th Oct 2013 रोजी प्रकाशित
अगरबत्ती आरोग्याला धोकादायक!
आपल्या आराध्या देवासमोर रोज पूजा करण्यासाठी वेगवेगळ्या अशा सुगंधी अगरबत्तींचा वापर आपण करतो.

First published on: 18-10-2013 at 11:27 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scented sticks are injuriouse to health