आज, म्हणजेच २६ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये माँ दुर्गेच्या नऊ रूपांची विधिवत पूजा केली जाईल. नवरात्रीत व्रत करणारी व्यक्ती उपासनेसोबतच दररोज दुर्गा सप्तशतीचे पठण करते. असे मानले जाते की दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वास करते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. जाणून घ्या दुर्गा सप्तशतीचे पठण करताना कोणत्या चुका करू नयेत.

दुर्गा सप्तशतीमध्ये १३ अध्याय आहेत. यातील ७०० श्लोकांमधून दुर्गा देवीची पूजा केली जाते. या १३ अध्यायांमध्ये माँ दुर्गेच्या तीन चरित्रांबद्दल सांगण्यात आले आहे. दुर्गा सप्तशतीचे पठण करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा.

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
Hanuman Jayanti
Hanuman Jayanti : हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळ गोचरमुळे ‘या’ राशींचे नशीब चमकरणार, मिळणार बक्कळ पैसा?
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : २४ तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब, एका महिन्यात मिळणार भरघोस पैसा अन् यश
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

Shardiya Navratri 2022 Wishes: शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या प्रियजनांना द्या ‘या’ मंगलमयी शुभेच्छा!

  • शास्त्रानुसार ज्या व्यक्तीने नवरात्रीच्या काळात आपल्या घरात कलशाची स्थापना केली असेल त्याच व्यक्तीने दुर्गा सप्तशतीचे पठण करावे.
  • श्री दुर्गा सप्तशती पठण करण्याआधी स्वच्छ ठिकाणी लाल कापड पसरवा. यानंतर पुस्तक ठेवा आणि कुंकू, तांदूळ आणि फुलांनी त्याची पूजा करा. नंतर कपाळाला कुंकू लावून पाठ सुरू करा.
  • श्री दुर्गा सप्तशतीचे पठण सुरू करण्यापूर्वी आणि समाप्तीनंतर ‘ओं ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे’ या मंत्राचा रोज जप करावा. यानंतरच पठण पूर्ण मानले जाते.
  • दुर्गा सप्तशतीचे पठण करताना शरीराबरोबरच मनही स्वच्छ असले पाहिजे. म्हणून पठण करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ कपडे घाला.
  • दुर्गा सप्तशती पठण करण्यापूर्वी शापोद्धार करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्याशिवाय पाठ केले तर ते फळ देत नाही. कारण यातील प्रत्येक मंत्राला वशिष्ठ, ब्रह्माजी आणि विश्वामित्र यांचा शाप मिळाला आहे.
  • दुर्गा सप्तशती पठण करताना प्रत्येक शब्दाचा उच्चार योग्य आणि स्पष्टपणे करा. तसेच, मोठ्या आवाजात पठण करू नका. जर तुम्हाला संस्कृत अवघड वाटत असेल तर तुम्ही हिंदीत पठण करू शकता.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)