Happy Navratri 2025 Wishes: शारदीय नवरात्रोत्सव हा देशभरात उत्साहाने साजरा केला जातो. नऊ दिवस देवीची आराधना केली जाते. यंदा नवरात्रोत्सव २२ सप्टेंबरपासून १ ऑक्टोबरपर्यंत साजरा केला जाणार आहे आणि २ ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा आहे. पौराणिक कथेनुसार, अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले. दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला, तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रुपांची पूजा केली जाते, त्यामुळे नऊ दिवस देवीची पूजा केली जाते. नवरात्र उत्सवाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असून नवरात्रीच्या काळात देवी व तिच्या विविध रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीनिमित्त सगळीकडे जल्लोष पाहायला मिळतो. नवरात्रोत्सवनिमित्त तुमच्या आप्तस्वकीयांना, प्रियजनांना शुभेच्छा दिल्या जातात तुम्ही त्यांना खालील सुंदर शुभेच्छा पाठवू शकता.
शारदीय नवरात्रीच्या शुभेच्छा (Happy Navratri 2025 Wishes)
१) नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः
नमः प्रकृत्यै भद्रायै नियतः प्रणताः स्म तम् ।।
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

२) महाकाली तुमचे रक्षण करो
महालक्ष्मी तुम्हाला सुख-संपत्ती देवो
महासरस्वती तुमच्या मुखी वसो,
नवरात्रीच्या अनंत शुभेच्छा!

३) जय जय जय देवी जगदंबा
तुळजा, एकवीरा तूच अंबा
आदिशक्ती तू त्रिभुवनेश्वरी
कीर्ती तुझी चराचरी
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
४) सोन पावलांनी आदिशक्ती तुमच्या घरी येवो,
सुख-संपत्तीसह तुम्हाला उदंड आरोग्य मिळो.
शारदीय नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

५) नवरात्री म्हणजे
न – नवचेतना देणारी
व – विघ्नांचा नाश करणारी
रा – राजसी मुद्रा असलेली
त्री- तिन्ही त्रिभुवनी वास करणारी
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

६) या देवी सर्वभूतेषु विद्या-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

७) तूच शारदा, तूच शक्ती
तूच शांभवी अन् तूच मुक्ती
चराचरात तूच आई
तुझ्या आगमनाने मन भरूनी जाई
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
८) नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते |
शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते ||
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
९) तुमच्यावर सदैव लक्ष्मीचा आशीर्वाद असो,
तुम्हाला सदैव सरस्वतीची साथ मिळो,
तुमच्या घरात सदैव गणेशाचे वास्तव्य असो,
माँ दुर्गेच्या आशीर्वादाने तुमचे आयुष्य अधिक प्रकाशमय होवो…!

१०) दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारी जन्ममरणांतें वारी ।
हारी पडलो आता संकट निवारी ॥
देवी आई आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो याच सदिच्छा!
११) देवी आदिशक्तीची कृपा तुमच्यावर सदा राहो।
अक्षय धन, सुख समृद्धी आणि ज्ञानाचा साठा होवो।।
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!