Shilpa Shetty Yoga Tips: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नुकताच एका आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पाय फ्रॅक्चर झाला. या दुर्घटनेनंतर सहा आठवड्यांसाठी डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला होता. शिल्पाने आपल्या सर्व नियमित जबाबदाऱ्यांमधून ब्रेक घेतला असला तरी आपली फिटनेसची आवड तिने या अवस्थेतही जपली आहे. पायाला फ्रॅक्चर असताना व्हीलचेअर वर बसून योगा करतानाचे व्हिडीओ शिल्पाने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे. या आसनांमुळे आपल्याला पायाचे फ्रॅक्चर भरून निघण्यास मदत होत असल्याचे सुद्धा शिल्पाने पोस्टमध्ये म्हंटले आहे. पायाचे स्नायू भरभक्कम करण्यासाठी नक्की कोणती आसने करावीत हे आज आपण शिल्पाच्या पोस्टमधून जाणून घेऊयात ..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिल्पा शेट्टीने सांगितली गुडघेदुखी असणाऱ्यांसाठी आसने

पर्वतासन: मन आणि शरीराला शांती, सामर्थ्य आणि ऊर्जा प्रदान करणारे हे सर्वात सोपे आणि प्रभावी योगासन आहे. त्याला ‘माउंटन पोझ’ असेही म्हणतात. जर आपण सूर्यनमस्कार करत असाल तर तुम्हाला हे आसन ओळखीचे वाटेल. डोक्यावर नेलेले हात हे निमुळत्या होत गेलेल्या पर्वताच्या टोकाप्रमाणे भासतात. म्हणून या आसनाला ‘पर्वतासन’ असे म्हणतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilpa shetty yoga with leg fracture very useful aasanas for knee pain bloating and muscle building svs
First published on: 23-08-2022 at 16:44 IST