Brain Hemorrhage Symptoms : काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवसचे दुःखद निधन झाले. रेड सॉईल स्टोरी या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून तो आणि त्याची पत्नी पूजा कोकणातील खाद्य संस्कृती दाखवायचे. पण, मधल्या काळात त्याला ब्रेन हॅमरेजचे निदान झाले आणि अखेर उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या आजाराची काही प्रमुख लक्षणे असतात, जी वेळीच लक्षात आली, तर जीव वाचू शकतो का? यावर सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. चला त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…

आजकाल वाईट खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली यांमुळे आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारचे आजार झपाट्याने वाढत आहेत. त्यामध्ये ब्रेन स्ट्रोकची समस्यादेखील लोकांमध्ये वेगाने दिसून येत आहे. ब्रेन स्ट्रोक हा सर्वांत त्रासदायक आजारांपैकी एक आहे. ब्रेन स्ट्रोक आता तरुणांमध्येही दिसून येत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, १५ वर्षांखालील मुले आणि २० ते ३० वयोगटातील तरुणांमध्ये या ब्रेन स्ट्रोक आजाराचा धोका वाढत आहे. मात्र, ब्रेन स्ट्रोक होण्यापूर्वीच शरीरात अनेक लक्षणे दिसू लागतात. अशा परिस्थितीत त्याकडे दुर्लक्ष करणे खूप घातक ठरू शकते.

ब्रेन हॅमरेजची लक्षणे

  • अचानक अशक्तपणा, मुंग्या येणे, बधीर होणे किंवा चेहरा, हात किंवा पायामध्ये अर्धांगवायू होणे
  • तीव्र डोकेदुखी
  • बोलण्यात अडचण
  • दृष्टी कमी होणे, अंधुक दिसणे किंवा दृष्टी कमी होणे
  • चक्कर येणे
  • ऊर्जेचा अभाव आणि झोपेचा त्रास

राष्ट्रीय आरोग्य सेवेनुसार, मेंदूला योग्यरीत्या रक्तपुरवठा होत नाही आणि तो विस्कळित होतो तेव्हा ब्रेन स्ट्रोक होतो. त्यामुळे मेंदूच्या पेशींचे नुकसान होते आणि मेंदूचे कार्य कमी होते; परंतु या आजाराची सुरुवातीची लक्षणे ओळखता येतात. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये आणि २० ते ३० वयोगटातील तरुणांमध्ये या ब्रेन स्ट्रोक आजाराचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत सल्ला दिला जातो की, तुमच्या शरीरात काही बदल दिसल्यास तुम्ही आधीच खबरदारी घ्यावी आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे मिनी स्ट्रोक येतो, ज्यामुळे रक्त मुक्तपणे फिरू शकत नाही. या रक्ताच्या गुठळ्या लहान व तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात आणि थोड्याच वेळात त्या परत विरघळतात. परंतु, या स्थितीकडे दुर्लक्ष करू नये आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ब्रेन स्ट्रोक टाळण्यासाठी काय करावे? जगायचं असेल तर ‘या’ चुका नकोच

ब्रेन स्ट्रोक टाळण्यासाठी कमी चरबीयुक्त, कमी मीठ व जास्त फायबर असलेले पदार्थ खावेत. ब्रेन स्ट्रोक टाळण्यासाठी नाशपाती, सफरचंद, केळी, गाजर, बीट, पालक, टोमॅटो, डाळी, राजमा, हरभरा इत्यादींचे सेवन केले जाऊ शकते.

कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे मेंदूत रक्तस्राव होण्याचा धोका असतो

ब्रेन हॅमरेजची अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ- एखाद्या व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत किंवा डोक्याला कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ शकते, ज्यामुळे मेंदूत रक्तस्राव होऊ शकतो. या सर्वांव्यतिरिक्त व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळेही मेंदूत रक्तस्रावदेखील होऊ शकतो. व्हिटॅमिन के रक्त गोठवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरात त्याची कमतरता असल्यास, रक्ताच्या गुठळ्या होऊ शकत नाहीत, ज्यामुळे कोणत्याही रक्तवाहिनीतून रक्तस्राव होण्याचा धोका वाढतो. जेव्हा मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये ही समस्या उद्भवते तेव्हा त्याला ब्रेन हॅमरेज, असे म्हणतात.

ब्रेन स्ट्रोकची गंभीर लक्षणे

अचानक अशक्तपणा किंवा सुन्नपणा जाणवणे

स्ट्रोकच्या सर्वांत सामान्य लक्षणांपैकी एक म्हणजे अचानक अशक्तपणा किंवा सुन्नपणा जाणवणे. या लक्षणाकडे लक्ष द्या. जर तुम्हाला काही दिवसांपासून विनाकारण जास्त थकवा जाणवत असेल किंवा विशेषत: शरीराच्या एका बाजूला सुन्नपणा जाणवत असेलम्हणून त्याबद्दल निष्काळजी राहू नका. ब्रेक स्ट्रोक झाल्यास, सुन्न चेहरा, हात किंवा पायांवर परिणाम करू होऊ शकतो.

वारंवार चक्कर येणे

काहीही कारण नसताना वेळोवेळी चक्कर येणे, पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही कोणत्याही कारणाशिवाय तीव्र डोकेदुखी, चालण्यास किंवा उभे राहण्यास त्रास होणे, पायांमध्ये अस्थिरता जाणवणे इत्यादी ब्रेन स्ट्रोकची लक्षणे सावधानतेचा इशारा देणारी असू शकतात.

दृष्टी कमकुवत होणे

एका किंवा दोन्ही डोळ्यांची दृष्टी कमी होणे किंवा गोष्टी पाहण्यासाठी जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज वाटणे हेदेखील संभाव्य स्ट्रोकचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला अशी लक्षणे जाणवत असतील, तर त्याबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घ्या.