Home Remedies to Clean Shower: तुम्ही कधी लक्ष दिलंय का? दिवसभराचा ताण, थकवा घालवणारा शॉवर जेव्हा तुम्ही सुरू करता, तेव्हा पहिल्या काही सेकंदांत पाण्याचा प्रवाह मंदावतो, फवारे तिरपे होतात किंवा कधी कधी अगदी काळसर पाणीही बाहेर येतं. हे फक्त पाण्याच्या दाबामुळे घडतं, असं समजणारे चुकतात. खरी गोष्ट अशी की, शॉवरच्या आतून नजरेआड असलेली माती, गंज, पांढरे डाग व घाण हळूहळू साचत जाते आणि मग त्याचा फटका थेट आपल्या त्वचेलाच बसतो. पुरळ, खाज, फोड असे त्रास त्यातूनच सुरू होतात.
पण, आता काळजीचं कारण नाही. कारण- आज आम्ही सांगणार आहोत असा भन्नाट जुगाड, ज्यासाठी फक्त एक प्लास्टिक पिशवी, टूथब्रश आणि घरातलंच साधं व्हिनेगर किंवा लिंबाचा रस लागणार आहे. ऐकूनच सोपं वाटतंय ना? पण परिणाम इतके जबरदस्त आहेत की, तुमचा शॉवर पुन्हा एकदा नव्यासारखा झळाळून उठेल.
शॉवर साफ करण्याची हटके पद्धत
१. जर तुमच्या शॉवरचा नोजल रबरसारखा असेल, तर टूथब्रशने घासून माती, डाग सहज निघून जातील.
२. काही शॉवर्सचं नोजल डब्याच्या झाकणासारखं वेगळं करता येतं. ते काढून पद्धतशीरपणे घासून स्वच्छ करा.
३. पण, जर शॉवर हेड काढता येत नसेल तर? इथे येतो भन्नाट जुगाड!
एका प्लास्टिक पिशवीत पाणी आणि व्हिनेगर (किंवा लिंबाचा रस) घाला. मग ही पिशवी शॉवरला बांधा. रबर बँड किंवा टेपने घट्ट अडकवा आणि खात्री करा की, शॉवर पूर्णपणे त्या मिश्रणात बुडालेला आहे. काही तास तसेच ठेवा. मग पिशवी काढा आणि शॉवर सुरू करा. काही सेकंद पाणी वाहू द्या… आणि बघा! घाण, गंज, पांढरे डाग गायब. शॉवर एकदम चकचकीत!
लहानशी, पण जबरदस्त टीप
दर आठवड्याला एका स्प्रे बाटलीमध्ये ५०% पाणी आणि ५०% व्हिनेगर मिसळून ठेवा. आठवड्यातून एकदा शॉवरवर स्प्रे करा. शॉवर ताजा आणि डागमुक्त राहील.
फॅन्सी बाथरूमचा लूक राखायचा आहे का?
शॉवर हेडवर पडणारे पांढरे डाग त्रासदायक असतात. त्यासाठी फक्त दोन रुपयांची मेणबत्ती घ्या आणि शॉवर हेडवर हलकेच रगडा. पाहता पाहता शॉवरची झळाळी परत येईल!
आता दर वेळी शॉवर सुरू करताना तुम्हाला ‘पावसाच्या सरींसारखा आनंद’ मिळेल. हा जुगाड एकदा करून बघा, मग फरक पाहून तुम्हीही थक्क व्हाल.