आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. यंदा श्रावणमास २५ जुलैपासून सुरू होत आहे. श्रावण आला की निसर्गाचे रूप अधिकच मनोहर दिसते. या महिन्याला धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या मोठे महत्त्व आहे. श्रावण म्हणजे आनंद, उत्साह आणि सणांचा महिना. ऊन-पावसाच्या खेळामध्ये इंद्रधनुष्याची शोभा श्रावणात अधिक खुलून दिसते. कधी मुसळधार पावसाच्या सरी कोसळतात, तर कधी सूर्यकिरणांनी आकाश उजळते.
श्रावण महिन्यात अनेक सण-उत्सव साजरे केले जातात, तसेच या महिन्याला आत्मिक जागृतीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच श्रावणाला सणांचा महिना असेही संबोधले जाते. या पवित्र महिन्याचे स्वागत खास पद्धतीने करण्यासाठी काही सुंदर आणि हटके मराठी शुभेच्छा, Quotes, Messages, Facebook Posts आणि WhatsApp Status दिले आहेत ते आपल्या प्रियजनांना आणि मित्रमैत्रिणींना पाठवून श्रावण मासारंभाच्या शुभेच्छा द्या.
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा | Shravan Month Wishes In Marathi
रंगात रंगला श्रावण
नभात उतरला श्रावण
पानात लपला श्रावण
फुलात उमलला श्रावण…
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सणासुदीची घेऊन उधळण,
हसत खेळत आला श्रावण..!
कर्तव्य आणि नात्यांची करतो आठवण..!
सर्व मिळून करूया परंपरेचे जतन..!
संस्कृतीचा अनमोल ठेवा जपू या आपण..!
आला हो आला, हसत खेळत आला श्रावण..!
श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवस घेऊन आला धो-धो कोसळणाऱ्या पावसाच्या धारा
त्यात आपल्या सर्वांचे दुःख आणि मनाची अशांतता वाहून जावो,
आजपासून अपणास सुख, शांती, भक्ती, श्रद्धा आणि संपत्ती प्रदान करो…
श्रावण महिन्याच्या स्नेहपुर्वक शुभेच्छा!
निसर्ग आला बहरून,
मनही आलं मोहरून
तुझ्या रंगात नहाण्या माझं मन होई पाखरू पाखरू
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
‘श्रावणा’च्या मंगलमय शुभेच्छा!
नटली सृष्टी
बदलली दृष्टी,
मनात आनंद मावेना
हसत, नाचत, गात आला श्रावण
श्रावण मासाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

आजपासून पवित्र श्रावण महिना सुरू होत आहे. या महिन्यात देवी-देवता, आपल्या हातून परमेश्वराची आराधना घडून आपल्याला व आपल्या कुटुंबियांना त्याचे पुण्य मिळो हीच सदिच्छा!
पवित्र श्रावण महिन्याच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
कोवळ्या उन्हात अलगद आली श्रावणसर
अवखळ वाऱ्याला आली अल्लडशी लहर
पानाफुलांना आला अनोखा बहर
तुषार किरणांनी साकारला इंद्रधनु
एका अलवार नात्याची सप्तरंगी प्रतिबिंब जणू
श्रावणमासाच्या खूप खूप शुभेच्छा!
या चिंबचिंब पावसात
अल्लड, अवखळ मनही
भिजण्यासाठी आतुरले,
सृष्टीच्या या श्रावण सोहळ्यात
मी ही सर होऊन पावसाची बरसले…
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रावणात या सृष्टीचं रूप जणू पालटते,
हिरवाईचा शेला नसून ही धरती माय सजते
अलगदपणे कृष्ण मेघांचा रेशमी पडदा सारून
कोवळा सूर्य पृथ्वीचे सुंदर रूप पाहतो चोरून
पानाफुलांतील सुंगध दरवळतो अन् मेघ पुन्हा पाझरतो
मग धरतीचा हिरवा शेला ओलचिंब होतो!
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आता आला गं श्रावण,
घेऊन पावसाच्या सरी,
सरीच्या मायेने धरती फुलली,
ही झाडं वेली बहरली,
पानं फुलं गंधाळली,
नटली गं धरत्री सारी,
किलबिलती पाखरे,
झाडाच्या फांदीवरी,
आनंदाने पंख पसरुनी,
मीच मला उराशी धरी!!!”
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
पर्णाच्या फांदीवर निनादला सूरमयी कोकीळेचे ताण
ऐसा मनभावन श्रावणमास सणाच्या पवित्रेला मान!!!
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
सरीवर सरी येतात आणि मन जातात भिजवून
श्रावण आला सांगतच येतात अगदी धावून!
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रावण मासला झाला प्रारंभ
करू शिवाच्या पूजेला आरंभ
ठेऊ शिवाचे व्रत
होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण
श्रावणी सोमवारच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
सुरू होणारा हा श्रावण तुमच्या मनाला सुख,
शांती आणि समाधान लाभणारा ठरू दे हीच सदिच्छा!
श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा
महादेवाला करू वंदन वाहू बेलाचे पान
महादेवा सदैव सुखी ठेव माझ्या प्रियजनांना
श्रावणी सोमवारच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
श्रावणाचा वारा वाहतो झुळझुळ….
संगे घेऊन येतो माहेरचा सांगावा तो प्रेमळ…
परसबागेतल्या त्या जाईजुईचा सुगंधी परिमळ….
ऐकू येते झोके झुलवणाऱ्या उंच तरूवेलींची सळसळ…
ओढ्यात बागडणाऱ्या खट्याळ पाण्याची खळखळ…
आईच्या हातच्या स्वादिष्ट पुरणपोळीचा दरवळ…
जागवलेल्या मंगळागौरीच्या आठवणींचा निशाकाळ….
दादा वहिनीची माझ्या माया स्निग्ध निर्मळ…
अन् निरोपाच्या क्षणी मनाची होणारी तळमळ…
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

हसरा नाचरा जरासा लाजरा,
सुंदर साजिरा श्रावण आला
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या
आलाय पाऊस भिजून घ्या
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रावणझुला झुला श्रावणी,
शेतकऱ्यांची फळे करणी।
डोलणारी ती पिके पाहूनी,
मनोमनी जाई तो हर्षूनी।।
श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा
पावसाने भिजून जाई अवखळसा किनारा,
श्रावणाच्या चाहुलीने हर्षे निसर्ग सारा….
श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा
तमसो मा ज्यॊतिर्गमय
सर्वांच्या आयुष्यातील अंधःकार
नष्ट होऊ दे, ज्ञान, आरोग्य, ऐश्वर्य
शांती व सौख्याचा प्रकाश अखंड
प्राप्त होऊ दे, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
आजपासून प्रारंभ होणाऱ्या पवित्र
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!!!

आकाशी मेघ गरजती,
गुंफून माळा सरींच्या,
मन चिंब भिजूनी जाई,
पावसाळ्यात श्रावणाच्या!
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
निळ्या नभातून बरसेल श्रावण
ऊन-पावसाचा खेळ करेल श्रावण
तहानलेल्या या धरतीला
धुंद सरींचा घोट पाजेल श्रावण
तना-मनास चिंब भिजवेल श्रावण
शब्दांची धुंद-तार छेडेल श्रावण.
श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा
श्रावणात पावसाने कमालच केली, धो धो कोसळून धमालच केली
अशाच मनसोक्त धारांसाठी श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा!
सृष्टीचं सर्वांत देखणं रूप, ऊन-पावसाचा सुंदर खेळ श्रावण महिन्यात अनुभवता येतो. सोबतीला व्रत-वैकल्याने भारावलेल्या वातावरणात श्रावणसरींचा आनंद घेऊया..आपणा सर्वांना या पवित्र श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रफुल्लित निसर्गाने जणू हिरवा शालू पांघरला, सणांचा राजा श्रावण जेव्हा अवतरला.
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझ्या येण्याची चाहूल लागताच मन जाई मोहरून, देह जाई शहारून
सरींनी या मन होई चिंब चिंब, श्रावण येई असा बरसून
श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा
घेतलीच नाही क्षणभरही उसंत
अशीही श्रावणातील सरींची भ्रांत.
श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा
हिरव्या वाटा उनाड लाटा अन् इंद्रधनुचा काठ
तृण बटा किरण छटा हा श्रवणाचा थाट!
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशिमधारा उलगडला
झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा
जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी
जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी
श्रावण मासाच्या हिरव्यागार शुभेच्छा!