Shreyas Iyer Injury : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना सिडनीच्या मैदानावर रंगला असताना एक अशी घटना घडली, ज्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरने असा एक झेल घेतला की, तो पाहून सर्व जण थक्क झाले. मात्र, या अप्रतिम झेलनंतर अय्यरला गंभीर दुखापत झाली. ऑस्ट्रेलियाच्या डावात अ‍ॅलेक्स केरीने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला; पण चेंडू हवेत उंच गेला. श्रेयस अय्यरने मागे वळून एक जबरदस्त झेल पकडला. हा झेल घेताना त्याला दुखापत झाली.

अय्यर मैदानातून बाहेर जात असताना त्याला खूप मोठ्या प्रमाणात वेदना आणि डोळ्यांत पाणी दिसत होते. त्याने घेतलेल्या झेलामुळे ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला; पण तो झेल घेताना अय्यरला झालेली दुखापत भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याला spleen laceration झाल्याचे समोर आले आहे.

श्रेयस अय्यरला नेमकं काय झालं? what is spleen laceration

श्रेयस अय्यरला pleen laceration झाल्याचे समोर आले आहे. प्लीहा फुटणे ही एक गंभीर दुखापत आहे, ज्यामुळे धोकादायक अंतर्गत रक्तस्राव होतो. spleen laceration अत्यंत रक्तवाहिन्यांसंबंधी आणि नाजूक असल्याने तो पोटातील सर्वांत सुरक्षित अवयवांपैकी एक आहे.

प्लीहा हा वरच्या डाव्या बाजूला असलेला एक मऊ, मुठीच्या आकाराचा अवयव आहे. तो शरीरात लाल रक्तपेशी तयार करतो. तो फाटल्यामुळे गंभीर स्वरूपाचा अंतर्गत रक्तस्राव होतो आणि त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते. अनेकदा तर शस्त्रक्रियाही करावी लागते. प्लीहा फुटणे हे मार लागल्यामुळे होते. आघात झाल्यानंतर लगेच किंवा सूज आल्यामुळे नंतर प्लीहा फाटू शकते.

प्लीहा फटल्यानंतर नेमकी कोणती लक्षणं दिसतात

रक्त कमी होणे आणि रक्तदाब जलद गतीने कमी होणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. त्याशिवाय चक्कर येणे, मानसिक गोंधळ आणि दिशाभूल होणे, धूसर दिसणे, अशक्तपणा, अस्वस्थता किंवा चिंता वाटणे, मळमळणे अशी लक्षणे दिसू लागतात. दरम्यान, ही दुखापत किती गंभीर आहे आणि तिचे निदान व उपचार किती लवकर होतात यावर पुढील परिणाम अवलंबून असतो. एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून गंभीर अंतर्गत रक्तस्राव झाल्यानंतर त्वरित उपचार न केले गेल्यास पुढील काही तासांतच त्याचा मृत्यू होऊ शकतो. फुटलेली प्लीहा बरी होण्यासाठी तीन ते १२ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो; परंतु तेसुद्धा दुखापतीचे स्वरूप आणि उपचारांवर अवलंबून आहे.

बीसीसीआयने काय सांगितलं?

“श्रेयस अय्यरच्या डाव्या बरगडीच्या खालच्या भागात दुखापत झाली आहे… त्याला अधिक तपासणी आणि उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.” “स्कॅनमध्ये प्लीहाला जखम झाल्याचे दिसून आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत, वैद्यकीयदृष्ट्या तो स्थिर आहे आणि तो बरा होत आहे,” असे बीसीसीआयने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे.