ऋतूचक्र बदललं की वातावरणातील फरक हळूहळू जाणवायला लागतो. त्यातच उन्हाळा असेल तर विचारायलाच नको. असह्य उकाडा, घाम यामुळे पार वैतागून जायला होतो. त्यामुळे अनेक वेळा आपण थंडावा मिळेल अशा गोष्टींचा शोध घेत असतो. त्यात फॅन, कुलर, एसी अशा गोष्टी पर्यायाने आपोआप येतात. त्यातच आता एसी अर्थात वातानुकूलित यंत्र ही अशी वस्तू झाली आहे, की १० पैकी ८ कुटुंबामध्ये नक्की पाहायला मिळालं. ऑफिस, घर, दुकानं या ठिकाणी आता एसीचा सर्रास वापर करण्यात येतो. विशेष म्हणज काही जणांना एसीची इतकी सवय झालेली असते, की एसी नसेल तर ते प्रचंड अस्वस्थ होतात. परंतु एसीचे जसे फायदे आहेत, तसेच काही तोटेदेखील आहेत.

१. हाडाशींसंबंधीत समस्या उद्भवणे –
एसीचा सर्वाधिक वापर हा कॉर्पोरेट ऑफिस किंवा घरामध्ये करण्यात येतो. १२-१२ तास एसीमध्ये राहिल्यामुळे घाम तर येत नाही. परंतु, हाडाशीसंबंधित समस्यांना नक्कीच आमंत्रण मिळतं. अनेक वेळा आपण रुम थंड व्हावी यासाठी एसीचं टेम्परेचर १६-१७ वर ठेवत असतो. त्यामुळे एसीतून येणारी गार हवा आपल्या शरीरावर त्याचा परिणाम करत असते. रुम प्रचंड थंड झाल्यामुळे हाड कमकूवत होत असतात. त्यामुळे एसीचं टेम्परेचर कायम स्थिर ठेवावं. एकदा टेम्पेचर सेट केल्यानंतर ते सतत बदलू नये.

२. शुद्ध हवेचा अभाव –
एसी लावल्यानंतर आपण अनेक वेळा दारं-खिडक्या बंद करतो. त्यामुळे घरात खेळणारी शुद्ध हवा थांबली जाते. २४ तास एसी रुममध्ये बसल्यानंतर येथे शुद्ध हवा येत नाही. परिणामी श्वसनासंबंधीच्या तक्रारीदेखील निर्माण होऊ शकतात. विशेष म्हणजे शरीराला ताजी हवा न मिळाल्यामुळे शरीराची वाढ होण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात.

३. चेहऱ्यावर सुरकुत्या –
घामावाटे शरीरातील अनावश्यक द्रव्ये बाहेर टाकली जातात. मात्र एसीमध्ये बसल्यामुळे शक्यतो घाम येत नाही. परिणामी हे द्रव्ये शरीरातच राहतात. त्यासोबतच सतत एसीमध्ये बसल्याने त्वचा कोरडी होते. त्वचेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे शरीरावर सुरकुत्या पडायला सुरुवात होते. त्यासोबत अनेक आजारही उद्भवण्याची शक्यता असते.