Signs of scalp cancer : तुम्ही कधी स्कॅल्प कॅन्सरबद्दल ऐकले आहे का? स्कॅल्प कॅन्सर हा डोक्याच्या त्वचेवर होणारा कर्करोग आहे. सामान्यतः जेव्हा त्वचेच्या कॅन्सरचा विचार केला जातो, तेव्हा हा आजार शरीराच्या त्या भागांमध्ये दिसून येतो जे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतात; जसे की चेहरा, मान आणि हात. खराब आहार आणि बिघडत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या या आजाराला क्युटेनियस स्केल्प मॅलिग्नन्सी असेही म्हणतात.
हानिकारक अल्ट्राव्हायोलेट (यूव्ही) किरणांच्या संपर्कामुळे टाळूचा कर्करोग होऊ शकतो. टाळूवरील त्वचेच्या कर्करोगाची लक्षणे खूप वेगवेगळी असू शकतात. बऱ्याचदा लोक टाळूवरील खाज सुटणे किंवा पुरळ येणे याला कोंडा समजतात. हेल्थलाइनच्या मते, टाळूवरील बदल हे टाळूच्या कर्करोगाचे लक्षण असू शकतात. जर ही लक्षणे वेळीच ओळखली गेली तर ही स्थिती गंभीर होण्यापासून रोखता येते. टाळूच्या कर्करोगाची लक्षणे कोणती आहेत ते जाणून घेऊया.
टाळूवर सतत जखमा
टाळूवर सतत जखमा, ज्या सहज बऱ्या होत नाहीत किंवा वारंवार होत राहतात त्या टाळूच्या कर्करोगाचे लक्षण असू शकतात. जर तुम्हालाही तुमच्या टाळूवर असे काहीतरी जाणवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टाळूच्या विशिष्ट भागात खाज सुटणे म्हणजे प्रत्येकवेळी कोंडा नाही
टाळूच्या विशिष्ट भागात सतत आणि वारंवार खाज सुटणे हे कोंड्याचे लक्षण नाही तर ते टाळूच्या कर्करोगाचे लक्षण आहे, चुकूनही याकडे दुर्लक्ष करू नका.
टाळूवर गाठी, सूज किंवा अनियमित ठिपके
टाळूवर नवीन गाठी किंवा सूज येणे जे सतत वाढत राहते, हे टाळूच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. त्वचेवर दिसणारे हे डाग सहसा रंग किंवा पोत बदलत राहतात. टाळू खवलेयुक्त, खडबडीत दिसते. अशी लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
उघड्या जखमा, अल्सर आणि रक्तस्त्राव
टाळूवरील जखमा, अल्सरच्या खुणा आणि रक्तस्त्राव ही टाळूच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात. या जखमा काही आठवड्यांत बऱ्या होत नाहीत आणि त्या कर्करोगामुळे होऊ शकतो. याशिवाय टाळूवरील रक्तस्त्राव हे देखील टाळूच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
केसांच्या वाढीच्या पद्धतीत बदल
जर तुम्हाला तुमच्या टाळूवरील केसांच्या वाढीच्या पद्धतीत बदल दिसला तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. केस पातळ होणे किंवा गळणे हे कर्करोगाचे लक्षण नाही, परंतु तुम्ही या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
टाळूभोवती सुजलेल्या गाठी
मानेभोवती किंवा टाळूभोवती सुजलेल्या गाठी हे टाळूच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.