Heart Attack Risk Study: हृदयविकाराचा झटका हे शब्द ऐकले की, अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. कारण- तो इतका अचानक येतो की, माणसाला त्यातून सावरायला वेळच मिळत नाही. डॉक्टर सांगतात की, हार्ट अटॅक हा बहुतेकदा सकाळच्या वेळी येतो, हिवाळ्यात त्याचा धोका जास्त असतो.
ब्रिटीश कार्डिओव्हॅस्क्युलर सोसायटी (BCS) च्या २०२३ मध्ये मॅन्चेस्टर येथे सादर केलेल्या संशोधनाने हार्ट अटॅकबाबत लोकांच्या समजुतींना पूर्णपणे बदलले आहे. या संशोधनात बेलफास्ट हेल्थ अँड सोशल केअर ट्रस्ट आणि आयर्लंडच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सचे डॉक्टर हे नेतृत्व करत होते. त्यांना आढळले की, काही वेळा गंभीर हार्ट अटॅक इतर दिवसांच्या तुलनेत विशिष्ट दिवशी जास्त प्रमाणात होतात.
संशोधनासाठी, २०१३ ते २०१८ या काळात १०,००० पेक्षा जास्त रुग्णांच्या नोंदींचा अभ्यास केला गेला. हे रुग्ण ST-segment elevation myocardial infarction (STEMI) साठी रुग्णालयात दाखल झाले होते. STEMI हा सर्वात गंभीर प्रकारचा हार्ट अटॅक मानला जातो आणि यासाठी तातडीने वैद्यकीय उपचार न मिळाले तर जीवनाला धोका असतो. संशोधनातून हे समजले की, गंभीर हार्ट अटॅक होण्याची शक्यता काही ठराविक परिस्थितींमध्ये जास्त वाढते. योग्य वेळी वैद्यकीय हस्तक्षेप न झाल्यास STEMI जीवघेणा ठरू शकतो.
छातीत वेदना, श्वास घ्यायला त्रास आणि अचानक कोसळलेला जीव… हार्ट अटॅक म्हणजे मृत्यूशी गाठ. पण एका नव्या संशोधनानं सिद्ध केलंय की, आठवड्याचा एक विशिष्ट दिवस हा मृत्यूचा सापळाच ठरतो. हृदयविकाराचा झटका या दिवशी जास्त प्रमाणात का होतो याचं रहस्य उलगडलं आणि डॉक्टरही हादरले. तो दिवस कोणता आहे, ते कळल्यावर तुम्हीही स्तब्ध व्हाल…
आठवड्याच्या सुरुवातीला हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये तब्बल १३ टक्क्यांनी वाढ झाल्याचं धक्कादायक सत्य संशोधनातून समोर आलं. पण नेमकं असं का घडतं? हृदयविकारतज्ज्ञ सांगतात की, आपल्या शरीराची नैसर्गिक सर्केडियन ऱ्हिदम म्हणजेच जैविक घड्याळ हार्मोन्सवर प्रभाव टाकते. हाच बदल रक्तदाब व हृदयाची गती असंतुलित करून हृदयावर अचानक ताण आणतो. त्यातच कामावर परतण्याचा ताण, वाढलेली जबाबदारी आणि कॉर्टिसोल नावाचा स्ट्रेस हार्मोन यांमुळे हृदय झपाट्यानं कमकुवत होतं.
त्यात सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे हार्ट अटॅकची लक्षणं वेळेत ओळखणे. छातीवर येणारा जडपणा, दाब, वेदना, श्वास घेण्यास त्रास, हात, मान, पाठीपर्यंत जाणारी वेदना, थंड घाम, चक्कर, मळमळ किंवा अचानक थकवा ही सगळी लक्षणं केवळ सामान्य त्रास समजून दुर्लक्षित करू नका. विशेषतः महिलांमध्ये ही लक्षणं सौम्य स्वरूपात दिसतात आणि म्हणूनच धोका दुपटीने वाढतो. डॉक्टरांचा स्पष्ट सल्ला आहे, “वेळ वाया घालवू नका, प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे. लक्षणं दिसली की, ताबडतोब आपत्कालीन उपचार घ्या.”
पण, आता मूळ प्रश्न हा सर्वाधिक प्राणघातक हार्ट अटॅक नक्की कोणत्या दिवशी होतो? संशोधकांच्या निष्कर्षानुसार, आठवड्यातील एक विशिष्ट दिवस सर्वांत घातक ठरला आहे. डॉक्टर म्हणतात की, लांब सुट्टी संपल्यावर ताण अचानक वाढतो, हार्मोन्स असंतुलित होतात आणि हृदयावर जोराचा दाब येतो.
आणि शेवटी जे सत्य समोर आलं ते म्हणजे, हार्ट अटॅकचा धोका ‘सोमवारी’ सर्वाधिक प्रमाणात असतो.