5 Easy Hacks To Remove Smell From Shoes: पावसाळ्यात बूट वारंवार ओले होतात. हवा दमट असल्याने आणि सारखा पाऊस भुरभुरत असल्याने मग ते अनेकदा चांगले वाळत नाहीत आणि मग त्यांचा खूपच दुर्गंध सुटतो. शाळेत जाणाऱ्या मुलांना तर दररोज शाळेचे बूट घालण्याशिवाय पर्यायच नसतो. त्यामुळे त्यांच्या बाबतीत तर ही समस्या जास्त जाणवते. अनेक जणांकडे चपला- बूट घरातच ठेवावे लागतात. बहुतांश फ्लॅट सिस्टिममध्ये तर तिच पद्धत आहे. अशावेळी मग असे घाण बूट घरात असले तर घरातही कुबट घाणेरडा वास येऊ लागतो. त्यामुळेच बुटांची दुर्गंधी घालविण्यासाठी, कमी करण्यासाठी हे काही घरगुती उपाय करून बघा. कारण अशा अस्वच्छ बुटांमुळे पायांच्या त्वचेलाही इन्फेक्शन होऊ शकतं.

आम्ही आज तुम्हाला ५ सोपे उपाय सांगणार आहोत ज्याने शूजला येणारा वास जाऊ शकतो. चला बघुयात काय उपाय आहेत.

बेकींग सोडा

बुटांमधला दुर्गंध कमी करण्यासाठी बेकींग सोड्याचाही चांगला वापर करता येतो. यासाठी बेकींग सोडा बुटांमध्ये टाकून ठेवा. एखादा तास तसाच राहू द्या. त्यानंतर एखाद्या स्वच्छ कपड्याने बुटांमधला बेकींग सोडा चांगला पुसून घ्या. यानंतर साधारण अर्ध्या- एक तासाने बूट घाला.

अल्कहोल

दुर्गंधी कमी होण्यास मदत करण्यासाठी आपल्या शूजच्या घाणेरड्या किंवा जीर्ण भागावर अल्कहोल चोळा. अल्कहोल बुटाला चोळल्यास फक्त सुंगंध येत नाही तर त्याच निर्जंतुकीकरण देखील होतं. करून बघा!

मीठ

स्नीकर्स आणि इतर कॅनव्हास शूज यांना खूप दुर्गंधी येऊ शकते, विशेषत: जर आपण उन्हाळ्यात मोजे न घालता शूज घातले तर शूजला खूप दुर्गंधी येते. आपल्या कॅनव्हास शूजमध्ये थोडे मिठाचे पाणी शिंपडून दुर्गंधी दूर करा.

पावडरचा उपयोग
बुटांमध्ये तुम्ही तुमचं नेहमीचं टाल्कम पावडर थोडं टाकून ठेवा. यामुळे बुटांमधला ओलसरपणा आणि दुर्गंध दोन्हीही शोषून घेतल्या जाईल तसेच पावडरचा सुवास बुटांना लागेल. आजकाल मेडिकेटेड फूट पावडर देखील मिळतात. या पावडर बुटांमध्ये टाकून ठेवल्याने त्यांच्यात फंगसची होणारी वाढ रोखली जाते आणि त्यामुळे आपोआपच घाण वास येणं कमी होतं.

हेही वाचा – Shampoo: शॅम्पूचे १०० पाऊच घेणं फायदेशीर की १०० रुपयांची एक बॉटल घेणं? काय जास्त योग्य?

लॅव्हेंडर तेल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुटांना येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी लॅव्हेंडर तेल देखील वापरले जाते. यासाठी या तेलाचे काही थेंब बुटामध्ये शिंपडा. त्याचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म दुर्गंध दूर करण्याचे काम करतात.