भारतात दिवसेंदिवस तापमान वाढत चालले आहे. उन्हाळा हा ऋतू तेलकट त्वचा म्हणजेच ऑयली स्किन असणाऱ्यांसाठी खूपच नुकसानदायक ठरतो. कारण उष्णता, घाम आणि चेहऱ्यावरील तेलकटपणा यामुळे दिवसभर चेहरा चिकट वाटतो. चिकटपणासोबतच त्वचेच्या समस्या जसे पिंपल्स, ब्लिमिशेस इत्यादी देखील होऊ लागतात.

आपला चेहरा स्वच्छ, सुंदर दिसावा अशी आपल्यापैकी बहुतेकांची इच्छा असते, अन्यथा आपल्याला कधीकधी लाजिरवाण्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. काही घरगुती उपायांनी आपण चेहऱ्यावर चमक आणू शकतो. हे उपाय तेलकट त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. तेलकट त्वचेचा त्रास असलेल्या लोकांनी त्यांच्या स्किन केअर रूटीनमध्ये २ गोष्टींचा समावेश केला तर त्यांच्या चेहऱ्यावरील चिकटपणा निघून जाईल.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू

Photos : गरापासून ते साल आणि बियांपर्यंत सर्वकाही आहे आरोग्यदायक; जाणून घ्या कलिंगडाचे ‘हे’ १५ फायदे

एक्सफोलिएशन :

तेलकट त्वचेवर मृत पेशी आणि घाण जमा होते, त्यामुळे चेहऱ्यावर मुरुमांची समस्या सुरू होते. तुम्ही आठवड्यातून एकदा स्क्रब करू शकता. पण लक्षात ठेवा की तेलकट त्वचेसाठी स्क्रब करताना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. त्याच वेळी, तुमच्या स्क्रबमध्ये मेन्थॉल आणि युकॅलिप्टस असणे आवश्यक आहे. ते त्वचेला शांत आणि थंड करण्यास मदत करतात.

आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या तुपाचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? केसांसाठी आहे अतिशय उपयुक्त

फेस पॅक :

तेलकट त्वचा निरोगी ठेवण्यासाठी फेस पॅकचाही वापर करणे आवश्यक आहे. आठवड्यातून एकदा फेसपॅक वापरून त्वचेला होणारे नुकसान टाळता येते आणि त्वचेला पोषक बनवता येते. तुम्ही मुलतानी माती फेस पॅक, कोरफड आणि हळद फेस पॅक, ओटमील आणि हनी फेस पॅक, बेसन आणि दही फेस पॅक इत्यादी वापरू शकता.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)