सध्या भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. मुंबईसारख्या शहरात देखील तापमान १६ अंश सेल्सिअसच्या खाली जातंय. इतकं कमी तापमान मुंबईकरांसाठी नक्कीच नवीन आहे. कारण दमट वातावरणात राहणाऱ्या मुंबईकरांना या तापमानाची सवय नाही. त्यामुळे सगळ्यांचीच वाईट अवस्था झाली आहे. या थंडीने अनेक आजारपणांना देखील आमंत्रण दिलं आहे. थंडीच्या दिवसात शरीराला गरम ठेवण्यासाठी आपण लोकराचे कपडे/स्वेटर वापरतो. यामुळे शरीरातील उब बाहेर जात नाही. लोकरीचे कपडे हे खरेतर उष्णता वाहक असतात जे शरीरातून बाहेर पडणाऱ्या उष्णतेला रोखून धरतात, ज्यामुळे शरीर उबदार राहते. उत्तर भारतात एवढी जास्त थंडी असते की लोकांना असे लोकराचे जाड कपडे घालूनच झोपावं लागतं. परंतु खूप कमी लोकांना हे माहित आहे की ही छोटी चूक आपल्या आरोग्याला खूप मोठे नुकसान पोहचवू शकते. रात्रीच्या वेळी तुम्हीदेखील लोकरीचे जाड स्वेटर घालूनच झोपत असाल तर यामुळे कोणते नुकसान होऊ शकते जाणून घ्या.

Health Tips: हिवाळ्यात घरी करून बघा ‘हे’ चविष्ट लाडू; आरोग्यासाठी आहेत भरपूर फायदेशीर

Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
health benefits of lauki
तुम्ही उन्हाळ्यात दर आठवड्याला दुधी खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
How To Make Amchur At Home kairichi Amboshi Pickle recipe
आजीच्या पद्धतीनं घरच्या घरी “आंबोशी” या पद्धतीने बनवा; वर्षभर टिकणारी चटकदार रेसिपी एकदा पाहाच
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू

लोकरीचे कपडे थंडीपासून कसा बचाव करतात?

तज्ञांनुसार लोकरीच्या धाग्यांमध्ये प्रचंड उब असते. असे म्हणता येईल की लोकर हा उष्णतेचा खराब वाहक आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात हवा अडवली जाते. याच कारणामुळे आपण लोकरीचे कपडे घालून थंडीपासून स्वतःचा बचाव करू शकतो. परंतु यामुळे आपल्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होतो.

होऊ शकतो ‘हा’ त्रास

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, थंडीमध्ये आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि जेव्हा आपण लोकरीचे कपडे घालून जाड चादरीत झोपतो तेव्हा अति उष्णतेमुळे काही वेळा अस्वस्थता, रक्तदाब कमी होणे अशा तक्रारी उद्भवू शकतात. अशा स्थितीत शरीर उबदार राहते पण शरीरातील उष्णता बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे रात्री झोपताना फक्त सुती कपडे घालूनच झोपावे.