सिगारेटच्या किमतीत एका डॉलरची वाढ झाल्यास धूम्रपान करणारे व्यसन कमी करत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे.

यासंबंधीचे संशोधन ‘एपिडेमोलॉजी’ या मासिकात प्रसिद्ध झाले आहे. मागील दहा वर्षांतील सिगारेटच्या दरात झालेली वाढ आणि त्याचा धूम्रपान करणाऱ्यांवर झालेला परिणाम यासंबंधीच्या आकडेवारीवरून हे संशोधन मांडण्यात आले आहे. दीर्घकाळापासून धूम्रपानाचे व्यसन असलेल्या व्यक्ती किंमत वाढली तरी व्यसन सोडू शकत नाहीत. मात्र, यामध्ये दीर्घकाळ धूम्रपान करणाऱ्यांचीच आकडेवारी मांडण्यात आल्याचे अमेरिकेतील ड्रेक्सेल विद्यापीठातील संशोधिका स्टेफाइन मायने यांनी म्हटले आहे.

आम्ही केलेल्या संशोधनानुसार सिगारेटच्या किमती वाढल्यास दीर्घकाळ धूम्रपानाचे व्यसन असणाऱ्यांनीच व्यसन कमी केल्याचे दिसून आले आहे, असेही मायने यांनी सांगितले. स्थानिक पातळीवरील धूम्रपानाच्या सवयी आणि सिगारेटची किंमत यांच्यातील संबंध या संशोधनात तपासण्यात आला आहे, असे ड्रेक्सेन विद्यापीठातील साहाय्यक प्राध्यापक अ‍ॅमे ऑचिनक्लोस यांनी सांगितले. मागील दहा वर्षांतील लोकसंख्येचा सखोल अभ्यास आणि तंबाखूच्या किमतींचा तपशील याद्वारे ही माहिती मिळविण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.