अनेकांच्या घरात आता सोफा सेट पाहायला मिळतो. बसायला आरामदायी आणि घरातील सजावटीतही सोफा सेट चांगला दिसतो. त्यामुळे अनेकजण जड लाकडी पलंगाऐवजी वजनाला हलका सोफा सेट घेतात. पण सोफा सेटवरील गाद्या खूप लवकर मळकट होतात. अनेकजण सोफासेटवर बसून खातात, लहान मुलं उड्या मारतात त्यामुळे सोफा सेट लवकर मळकटलेला दिसतो. अशावेळी तो साफ कसा करायचा असा प्रश्न पडतो. सोफा सेट वेळीच साफ न केल्यास त्यात अनेक बॅक्टेरिया- व्हायरस जमा होतात, ज्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोफा सेट साफ करण्याच्या अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही जुना सोफा चकाचक करु शकता.
लेदर सोफा सेट कसा स्वच्छ करायचा?
अनेकांच्या घरात लेदरचा सोफा सेट असतो. हे सोफे खूप महाग असतात आणि त्यांची देखभाल करणेही खूप कठीण असते. या प्रकारचा सोफा स्वच्छ करण्यासाठी माईल्ड क्लिनरचा वापर करावा. तुम्ही कोणत्याही चांगल्या कंपनीचे क्लीनर खरेदी करून लेदर सोफे अगदी आरामात स्वच्छ करु शकता. या सोफ्यांसाठी नेहमी सॉफ्ट ब्रश आणि व्हॅक्यूम क्लिनर वापरा. सोफाच्या टोकांवर साचलेली धूळ साफ करण्यासाठी तुम्ही पाण्यात व्हिनेगर मिसळून ते वापरू शकता. हे सोफे खूपचं सॉफ्ट असल्याने त्यावर ब्रशने जोर लावून घासू नका.
रोज थोडावेळ जमिनीववर बसण्याची सवय ठेवा; शरीरास मिळतील ‘हे’ फायदे
फॅब्रिक सोफा कसा स्वच्छ करायचा?
बहुतेकांच्या घरात आजकाल फॅब्रिकच्या सोफ्यांना पसंती दिली जाते. हे सोफे खूपचं आकर्षक दिसतात. यासोबतच त्यावर बसल्यानंतरही खूप आरामदायी अनुभव येतो. अशा सोफ्यांची साफसफाई करणे खूप कठीण होते. जर तुमच्या घरात फॅब्रिकचा सोफा असेल तर तो स्वच्छ करण्यासाठी तुम्ही काही खास टिप्स फॉलो करू शकता.
फॅब्रिकने सोफा स्वच्छ करण्यासाठी थोडा बाथ सोप घ्या. यानंतर एक कप पाणी गरम करून त्यात तो साबण टाका. या साबणाचे मिश्रण तयार झाल्यावर त्यात २ चमचे एनोनिया किंवा मध घाला. त्यानंतर द्रावण थंड होऊ द्या. द्रावण थंड झाल्यावर ते हातात ठेवून फेस बनवा. त्यानंतर कापड किंवा स्पंजच्या मदतीने सोफ्याच्या घाणेरड्या भागावर तो फेस लावून स्वच्छ करा. यानंतर सोफा पंख्या खाली चांगला सुकू द्या. थोड्या वेळाने तुमचा सोफा पूर्वीसारखा चमकदार, स्वच्छ दिसू लागेल.