Soybean Health Benefits: तुम्हाला जर लवकर थकवा येत असेल, अशक्त वाटत असेल किंवा स्नायूंची ताकद वाढवू शकत नसाल तर तुमच्या आहारात प्रथिनांची कमतरता असू शकते. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की, प्रथिने फक्त अंडी, मांस किंवा दुधात आढळतात पण तसं नाहीये. शाकाहारी लोकांनादेखील भरपूर प्रथिने सहज मिळू शकतात आणि सोयाबीन हा एक उत्तम, परवडणारा आण शक्तिशाली पर्याय आहे.
सोयाबीनला शाकाहारी मांस असेही म्हणतात. कारण ते मांसाहारी पदार्थांइतकेच प्रथिने देतात. म्हणूनच डॉक्टर आणि पोषणतज्ज्ञ आपल्या दैनंदिन आहारात त्यांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. तर मग प्रथिनांचे पौष्टिक मूल्य, त्याचे फायदे आणि ते आपल्या आहारात कसे समाविष्ट करावे याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
सोयाबीनमधील पोषक घटक
सोयाबीन हे केवळ प्रथिनांचाच उत्तम स्त्रोत नाही, तर अनेक महत्त्वाच्या पोषक तत्वांचा देखील स्त्रोत आहे. त्यात प्रथिने, कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्व बी६ आणि बी १२, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतात. हे पोषक तत्व शरीराला ऊर्जा, हाडांची ताकद आणि स्नायूंना मजबूत करण्यास मदत करते.
सोयाबीनच्या तुलनेत इतर पदार्थांमध्ये किती प्रोटीन असते?
- एका अंड्यात जवळपास १३ ग्रॅम प्रोटीन असते.
- १०० ग्रॅम दुधात ३.४ ग्रॅम प्रथिने असतात
- चिकन-मटण अशा मांसाहारी पदार्थांत प्रत्येकी १०० ग्रॅममध्ये २६ ग्रॅम प्रथिने मिळू शकतात.
- प्रत्येकी १०० ग्रॅम सोयाबीनमध्ये ३६.५ ग्रॅम प्रथिने मिळू शकतात.
सोयाबीन खाण्याचे आश्चर्यकारक फायदे
- सोयाबीनमध्ये असलेले पोषक घटक साखर वेगाने वाढू देत नाहीत आणि इन्सुलिनला चांगले काम करण्यास मदत करतात.
- कॅल्शियम आणि मॅग्नेशियममुळे कमकुवत हाडे असलेल्या लोकांसाठी सोयाबीन खूप फायदेशीर आहे. प्रथिने आणि फायबर जास्त असलेले आहार भूक कमी करण्यास आणि फॅट बर्न करण्यास मदत करू शकते, त्यामुळेच ते वजन कमी करण्यास मदत करू शकते.
- सोयाबीन कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास आणि रक्तदाब राखण्यास मदत करते. हे हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरते.
- सोयाबीनमधील अँटीऑक्सिडंट्स पैशींच्या नुकसानापासून संरक्षण करतात. यामुळे कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते?
- सोयाबीन खाल्ल्याने नसा मजबूत होतात, स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते. शिवाय लोह आणि प्रथिनांचे प्रमाण केसगळती कमी करतात आणि त्वचा निरोगी ठेवतात.
रोज किती सोयाबीन खावे?
दररोज सुमारे १०० ग्रॅम सोयाबीन तुम्ही खाऊ शकता. यातून अंदाजे ३६.५ ग्रॅम प्रथिने मिळतात. जिममध्ये जाणाऱ्यांसाठी किंवा प्रथिनांची कमतरता असलेल्यांसाठी हे अत्यंत फायदेशीर आहे. शाकाहारी लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे, कारण त्यात संपूर्ण प्रथिने असतात. त्यात स्नायू तयार करण्यासाठी आणि तुटलेले तंतू दुरूस्त करण्यासाठी आवश्य असलेले अमिनो आम्ल असतात. व्यायामानंतर स्नायू तुटतात. सोयाबीन त्यांना दुरूस्त करण्यास आणि नवीन स्नायू तयार कऱण्यास मदत करते.
