Mental Health Tips For Stress Relief : मानसिक आरोग्याविषयी अनेक जण बोलतात, त्यावर चर्चा करतात. अर्थात, अशा चर्चांमुमुळे मानसिक आरोग्याच्या समस्या सोडवण्यास अनेकांना मदतसुद्धा झाली आहे. त्यामुळे आजच्या धावपळीच्या जीवनात तुमचे मानसिक आरोग्य नियंत्रित ठेवणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. मानसिक आरोग्य नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही अनेक ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेऊ शकता. किंवा तुमचा मूड सुधारण्यास मदत करणारी एखादी गोष्ट करू शकता. त्यापैकी एक म्हणजे ‘गाणे ऐकण्याने तुमच्या दिवसाची सुरुवात करणे’.
आपल्यातील अनेक जण नोकरी किंवा कॉलेजला जाण्यासाठी ट्रेन किंवा बसने प्रवास करतात. यादरम्यान प्रवासात वेळ जावा यासाठी आपण अनेक जण हेडफोन्सद्वारे गाणी ऐकतो. तर याच गाण्याच्या श्रवणामध्ये उपचारशक्ती असल्याचे ज्ञात झाले आहे. तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात एखादे शांत गाणे ऐकून करू शकता. तुमच्या आरोग्यासाठी ते फायदेशीरसुद्धा ठरू शकते.
गाणी ऐकून दिवसाची सुरुवात करणे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते याबद्दल सविस्तर जाणून घेऊ…
मूड बूस्ट करणे आणि सकारात्मकता वाढवते (Boosts Mood and Positivity)
सकाळी तुमचे आवडते गाणे ऐकल्याने डोपामाइनचे (dopamine) उत्सर्जन होऊ शकते, जे एक न्यूरोट्रान्समीटर आहे. हे चिंता, ताण किंवा कमी ऊर्जेच्या भावनांशी लढण्यास मदत करतात, ज्यामुळे तुमचा उर्वरित दिवस सकारात्मक राहतो.
ताण आणि चिंता कमी करते (Reduces Stress and Anxiety)
गाण्यामध्ये मज्जासंस्था शांत करण्याची शक्ती असते. आरामदायी ट्यून किंवा एम्बिएन्ट म्युजिक कॉर्टिसोलची पातळी कमी करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे ताण आणि चिंता कमी होण्यास मदत होते. त्यामुळे गाण्याने दिवसाची सुरुवात केल्याने शांततेची भावना निर्माण होण्यास मदत होते. तसेच तुम्हाला पूर्ण दिवस एखाद्या गोष्टीचा सामना अधिक स्पष्ट आणि शांत मनाने करण्यास मदत होते.
प्रेरणा आणि उत्पादकता वाढवते (Increases Motivation and Productivity)
जेव्हा तुम्ही उत्साही गाणे ऐकता तेव्हा प्रेरणा आणि लक्ष केंद्रित करण्यास तुम्हाला मदत होते. त्यामुळे मेंदू उत्तेजित होतो आणि तुम्हाला संपूर्ण दिवसासाठी तयार करतो. तुम्ही कामावर जात असाल, कसरत करत असाल किंवा कामांचा व्यग्र दिवस असो, गाणे तुम्हाला दिवसाची योग्य सुरुवात करण्यासाठी एक प्रेरणादायी साधन असू शकते.
सर्जनशीलता वाढवते (Increases Creativity)
गाणं , विशेषतः वाद्य किंवा शास्त्रीय संगीत मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करू शकते, ज्यामुळे सर्जनशीलता आणि संज्ञानात्मक कार्यक्षमता वाढते. गाण्याने तुमचा दिवस सुरू केल्याने तुम्हाला समस्या सोडवण्यास आणि योग्य विचार करण्यास मदत होऊ शकते. कारण ते तुमच्या मेंदूला मानसिक लवचिकता देते.
माइंडफूलनेस आणि प्रेजेन्स (Mindfulness and Presence)
‘माइंडफुलनेस’ म्हणजे मनाची पूर्णभान अवस्था. सकाळी तुम्ही ऐकत असलेल्या गाण्यावर लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला सध्याच्या क्षणी स्थिर राहण्यास मदत होऊ शकते. माइंडफुलनेसचा हा सराव तुमच्या डोक्यात सतत येणारे विचार कमी करू शकतो, ज्यामुळे तुम्हाला दिवसाची सुरुवात अधिक लक्ष केंद्रित करून करण्यास मदत होते.