Vegetables For Uric Acid Control: शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढले की, त्याचे दुष्परिणाम फार गंभीर ठरू शकतात. सांधेदुखी, गाऊटचे झटके, सूज व किडनीचे आजारही या कारणामुळे उदभवतात. वैद्यकीय उपचार आणि व्यायामाबरोबर योग्य आहार घेतल्यास युरिक अॅसिडचे प्रमाण नैसर्गिकरीत्या कमी करता येते. तज्ज्ञ सांगतात की, नियमित आहारात फक्त काही भाज्या समाविष्ट केल्या, तर महिनाभरात फरक जाणवू शकतो. पाहा, त्या ‘५’ चमत्कारिक भाज्या कोणत्या आहेत?

लघवीवाटे निघेल युरिक ॲसिड! फक्त ‘या’ भाज्या खा आणि ३० दिवसांत जाणवा फरक!

१. काकडी

काकडीत तब्बल ९९% पाणी असते, जे शरीरातील घातक युरिक अॅसिड लघवीतून बाहेर टाकण्यास मदत करते. तिचा थंडावा आणि शीतल गुण सूज कमी करतात, तर किडनीचं कार्य सुधारतात. सलाड, रस किंवा थंड पेय म्हणून घेतल्यास काकडी शरीरातील विषारी घटक बाहेर काढते आणि युरिक ॲसिडचा साठा कमी करते.

२. गाजर

गाजरातील नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स आणि तंतुमय घटक (फायबर) मेटाबॉलिझम सुधारतात. दररोज गाजर सलाडमध्ये किंवा रस म्हणून घेतल्यास शरीरातील अतिरिक्त युरिक ॲसिड कमी होते. गाजरातील दाहशामक गुणधर्म सांधेदुखी आणि गाऊटच्या वेदना कमी करण्यास मदत करतात.

३. टोमॅटो

टोमॅटो शरीरातील अतिरिक्त आम्लता (ॲसिडिटी) कमी करून, युरिक ॲसिडचे प्रमाण नियंत्रित ठेवतो. त्यात असलेला लायकोपीन आणि व्हिटॅमिन सी हे घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि सांध्यातील सूज कमी करतात. नियमित आहारात टोमॅटो समाविष्ट केल्यास किडनी आणि यकृताचे कार्य सुधारते.

४. कारले

कारल्यातील पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम व लोह हे घटक शरीरातील युरिक ॲसिडचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. कारल्याचा रस किंवा भाजून घेतलेले कारले हे दोन्ही प्रकार उपयुक्त आहेत. कारल्याचे नियमित सेवन केल्यास किडनी आणि यकृताची कार्यक्षमता वाढते आणि गाऊटमुळे होणाऱ्या सूज-वेदनांपासून आराम मिळतो.

५. सिमला मिरची

सिमला मिरचीमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीरातील आम्लता कमी करून युरिक ॲसिड बाहेर टाकतात. सिमला मिरची सलाड, भाजी किंवा स्नॅकमधून घेतल्यास सांधेदुखी कमी होते आणि रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता सुधारते.

काय करावं? आणि काय टाळावं?

फक्त या भाज्यांवर अवलंबून राहू नका; पुरेसं पाणी प्या, ज्यामुळे किडनीला युरिक ॲसिड बाहेर टाकणं सोपं होतं. रेड मीट, ऑर्गन मीट, शेलफिश व तेलकट मासे यांसारखे प्युरिनयुक्त पदार्थ टाळा. त्याऐवजी अंडी, लो-फॅट दुग्धजन्य पदार्थ, कडधान्ये व वनस्पती-आधारित प्रथिने घ्या.

दररोज हलका व्यायाम चालणे, पोहणे, सायकलिंग किंवा योग यांमुळे चयापचय (मेटाबॉलिझम) सुधारते आणि युरिक ॲसिड नैसर्गिकरीत्या कमी होते. वजन जास्त असल्यास ते कमी करा. कारण- चरबी युरिक ॲसिड वाढवण्याचं मोठं कारण आहे. तसेच ताणतणाव, मद्यपान आणि साखरयुक्त पेयं टाळा.

महत्त्वाचं : या भाज्या जादुई उपाय नाहीत; पण योग्य आहार, औषधोपचार आणि व्यायामासोबत घेतल्यास केवळ एक महिन्यात युरिक ॲसिडचे प्रमाण घटू शकते.