बजेट फोन बनवणारी कंपनी Tecno ने आपल्या ‘स्पार्क’ सीरिजमध्ये अजून एक स्वस्त फोन अ‍ॅड केलाय. कंपनीने Tecno Spark 5 हा नवीन लॉन्च केला . या फोनची खासियत म्हणजे यात एकूण पाच कॅमेरे आणि 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी आहे.

फीचर्स –
Tecno Spark 5 फोनमध्ये 8 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यासह 6.6 इंचाचा पंच-होल डिस्प्ले आहे. तर, मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप देण्यात आला आहे. त्यात एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. अँड्राइड 10 ओएसवर आधारित या फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. मिस्टी ग्रे, व्हॅकेशन ब्लू, आइस जॅडाइट आणि स्पार्क ऑरेंज अशा चार रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असेल. यात 2GB रॅम आणि 32GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. मेमरी माइक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येणे शक्य आहे. Tecno Spark 5 मध्ये याशिवाय मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आलंय. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G VoLTE , 3.5 एमएम हेडफोन जॅक यांसारखे फीचर्स आहेत.

आणखी वाचा- तब्बल 108 MP चा कॅमेरा! भारतात याच आठवड्यात लॉन्च होणार Xiaomi चा शानदार फोन

किंमत –
सध्या Tecno Spark 5  केवळ दक्षिण आफ्रिकेत लॉन्च करण्यात आला असून भारतीय चलनानुसार याची किंमत जवळपास 9,300 रुपये आहे. हा फोन भारतात केव्हा लॉन्च केला जाईल याबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही. पण आता लॉकडाउनचे निर्बंध शिथील झाल्याने लवकरच कंपनी Tecno Spark 5  भारतात लॉन्च करण्याची शक्यता आहे. याशिवाय कंपनीचा ‘स्पार्क 4’ हा स्मार्टफोन भारतात 7,999 रुपयांमध्ये आधीपासूनच उपलब्ध आहे.