How to Wash Soft Toys : सध्या प्रेमाचा आठवडा म्हणजे व्हॅलेंटाईन आठवडा सुरूआहे. सात फेब्रुवारीला रोझ डे पासून या खास प्रेमाच्या आठवड्याची सुरूवात झाली आहे.प्रेमी युगुल या आठवड्यात वेगवेगळ्या प्रकारे आपले प्रेम व्यक्त करतात. कधी प्रिय व्यक्तीला गुलाब देतात तर कधी चॉकलेट देतात. या आठवड्यात या प्रेमी लोकांसाठी प्रत्येक दिवस साजरा केला जातो. जसे की रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे इत्यादी. या सर्व दिवसांमध्ये टेडी डे हा खास मानला जातो कारण या दिवशी प्रेमी युगुल एकमेकांना प्रेमाची आठवण म्हणून टेडी देतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक जण वर्षानुवर्षे खास आठवण म्हणून टेडी सांभाळून ठेवतात. अनेकदा हे टेडी मळतात. मग टेडी धुवावे कसे? हा सुद्धा प्रश्न पडतो. तुमच्या कडे असे जुने टेडी आहेत का? किंवा तुमचे जुने टेडी मळलेले आहेत का? तर टेन्शन घेऊ नका. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओमध्ये घरच्या घरी जुने टेडी कसे स्वच्छ करायचे, याविषयी सविस्तर माहिती सांगितली जाते. आज आपण अशाच एका व्हिडीओतील ट्रिक जाणून घेणार आहोत.

या व्हायरल युट्यूबवरील व्हिडीओमध्ये एक तरुणी घरच्या घरी टेडी बिअरला कसे स्वच्छ करायचे, याविषयी माहिती सांगताना दिसतेय. काही टेडी बिअरला झिप असते तर काही टेडी बिअरला झिप नसते. झिप असलेले टेडी बिअर स्वच्छ करताना अडचण येत नाही. त्यातील कापूस काढून टेडी स्वच्छ केला जातो पण काही असेही टेडी असतात की ज्यांना झिप नसते, असे टेडी बिअर स्वच्छ करणे म्हणजे हे कठीण काम आहे. या व्हिडीओत ही तरुणी फक्त एका साबणाने टेडी बिअर स्वच्छ करून दाखवते.
व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे, कोणताही एक साबण घ्यावा. या साबणाला पाणी लावावे आणि टेडीवर हाताने घासावे. संपूर्ण टेडीवर साबण नीट लावावा आणि त्यानंतर पाण्याने टेडी धुवावा. त्यानंतर शक्य होत असेल तर हाताने टेडीतील पाणी काढण्याचा प्रयत्न करावा आणि त्यानंतर उन्हात एका स्टूलवर हा टेडी ठेवावा. टेडी थोडा वाळल्यानंतर टेडीवर कंगवा फिरवावा. टेडी पूर्णपणे वाळवल्यानंतर नव्यासारखा दिसेल. जर तुमच्याकडे सुद्धा असा मळलेला जुना टेडी असेल तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता.

Aafreen Shaikh या युट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “फक्त एका साबणाचा वापर करून टेडी बिअर स्वच्छ करतेय” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान व्हिडीओ आहे” तर एका युजरने लिहिलेय, “खूप महत्त्वाची माहिती दिली” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरंच ही आयडिया खूप छान आहे. मला याचा फायदा झाला” अनेक युजर्सनी आभार व्यक्त केले आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teddy day 2024 valentine week 2024 how to wash teddy bear at home try desi jugaad of cleaning teddy with the help of only one soap ndj
First published on: 09-02-2024 at 20:00 IST