Home Remedies For Yellow Teeth : तोंडाच्या आरोग्याची स्थिती अलिकडेच चिंतेचा विषय ठरते आहे. लहान वयातच दात किडणे, दात पिवळे होणे, कमकुवत हिरड्या, तोंडाची दुर्गंधी आणि दातांमध्ये पायोरिया आदी समस्या वाढत आहेत. या समस्या केवळ तोंडापुरत्या मर्यादित राहत नाहीत. तर हळूहळू तुमच्या दिसण्यावर, एकूण आरोग्यावरही परिणाम करतात. अस्वस्थ जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी, तोंडाची अस्वच्छता यामुळे दात पिवळे होतात आणि या समस्येचे मुख्य कारण चहा, कॉफी, तंबाखू किंवा थंड पेयांचे जास्त सेवन हेच आहे.

तर या समस्येवर उपाय म्हणून बरेच लोक विविध रासायनिक टूथपेस्ट, माउथ फ्रेशनर्स वापरतात. सुरुवातीला या वस्तू फायदेशीर वाटत असतील तरी, कालांतराने दात आणि हिरड्या कमकुवत होऊ लागतात. अशा परिस्थितीत, नैसर्गिक उपाय सर्वात सुरक्षित आणि प्रभावी ठरतात. आयुर्वेदात अनेक पदार्थांचा उल्लेख आहे; जे दात चमकदार ठेवण्यास, हिरड्या मजबूत करण्यास मदत करतात. आरोग्य तज्ज्ञ सुभाष गोयल स्पष्ट करतात की, त्रिफळा, हळद आणि मोहरीचे तेल हे तोंडाच्या आरोग्यासाठी महत्वाच्या ठरतात.

त्रिफळा चुर्ण – त्रिफळा चुर्ण हा एक प्राचीन आणि विश्वासू आयुर्वेदिक उपाय आहे. त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स आहेत; जे दातांवरील दातांवरील टार्टर आणि प्लेक काढून टाकण्यास मदत करतात. यामुळे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात, तोंडाची दुर्गंधी कमी होते, नियमित सेवनाने दात नैसर्गिकरित्या पांढरे होतात, हिरड्या मजबूत होतात, पायोरियासारख्या समस्या कमी होतात. त्यामुळे त्रिफळा चुर्ण केवळ तोंडाच्या आरोग्यासाठीच नाही तर संपूर्ण पचनसंस्थेसाठी देखील फायदेशीर आहे.

हळद – भारतीय स्वयंपाकघरात सहज आढळणारी हळद दातांसाठी वरदान आहे. हळदीतील करक्यूमिन घटक बॅक्टेरियाची वाढ रोखतात, जळजळ कमी करतात, हिरड्यांमधील सूज, रक्तस्त्राव किंवा वेदना कमी करण्यास मदत, नियमित वापरामुळे दातांवरील पिवळा थर निघून जातो, नैसर्गिक चमक परत येते. त्याचबरोबर पायरिया आणि हिरड्यांच्या इतर समस्यांवर उपचार करण्यासाठी हळद फायदेशीर ठरते; यामुळे तोंड स्वच्छ ठेवते आणि आरोग्य सुधारते.

मोहरीच्या तेलाचे फायदे – मोहरीचे तेल केवळ स्वयंपाकातच नाही तर दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहे. त्याचे अँटीमायक्रोबियल गुणधर्म दातांचे जंतूंपासून संरक्षण करतात. त्याचप्रमाणे मोहरीच्या तेलाने हिरड्यांना मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते, दात मजबूत होतात. हळद आणि त्रिफळा बरोबर मोहरीचे तेल मिक्स करून वापरल्यास दात स्वच्छ आणि पांढरे होण्यास मदत करते.