How to remove spider webs from house: दररोजच्या साफसफाईतही घरातील असे काही कोपरे असतात, ज्यांच्याकडे आपलं नकळत दुर्लक्ष होतं. परिणामी त्यामुळे घरात कोळ्याचे जाळे दिसू लागते. लोक या समस्येपासून वाचण्यासाठी विविध मार्ग शोधतात. आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे कोळ्याचे जाळे काढणे सोपे होईलच,त्याशिवाय या समस्येपासून कायमची सुटका होईल.
घरातून कोळ्याचे जाळे काढण्यासाठी प्रथम कोळ्याच्या जाळ्यात कोळी आहे का ते तपासा. कारण- जर कोळी असेल, तर साफसफाई केल्यानंतर तो दुसऱ्या भिंतीला चिकटून पुन्हा जाळे बनवू लागतो. अशा परिस्थितीत ही समस्या टाळण्यासाठी कोळी मारणाऱ्या औषधांचा वापर करा.
कोळ्याला दूर ठेवण्यासाठी घरगुती स्प्रे बनवा
कोळ्याला दूर करण्यासाठी लिंबू, संत्री किंवा पुदिन्याच्या पानांचा वापर करून स्प्रे बनवू शकता. कोळ्याला त्याचा वास अजिबात आवडत नाही. ज्या ठिकाणी कोळ्याचे जाळे तयार होते, त्या ठिकाणी तुम्ही हा स्प्रे फवारू शकता.
व्हिनेगर किंवा दालचिनीचा स्प्रे तयार करा
व्हिनेगरप्रमाणेच दालचिनीचा वासदेखील खूप तीव्र असतो, जो कोळी पळवून लावण्यास मदत करू शकतो. तुम्हाला फक्त कोळ्याचे जाळे असलेल्या ठिकाणी दालचिनी पावडर शिंपडावी लागेल आणि नंतर पाहा की, कोळी तीव्र वासामुळे पळून जाईल.
