लग्नानंतर पती-पत्नीच्या नात्यात समस्या येणे सामान्य बाब आहे. त्यासाठी अनेकवेळा कुटुंबीय आणि नातेवाईक दोघांमध्ये समेट घडवून दुरावा दूर करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा त्यांना यश मिळत नाही तेव्हा विवाह समुपदेशकांची मदत घेतली जाते. परंतु मागील काही दिवसांपासून एक नवा ट्रेंड पाहायला मिळतोय. आता विवाहित जोडपी लग्नानंतर नाही तर लग्नाआधीच विवाह समुपदेशनाचे सत्र घेत आहेत. लग्नाआधी विवाह समुपदेशनाचा हा ट्रेंड मेट्रो शहरांमध्ये झपाट्याने वाढत आहे. याला प्री-मॅरेज काउन्सिलिंग असेही म्हणता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समुपदेशन किंवा काउन्सिलिंग हा शब्द ऐकताच लोक हा अंदाज लावतात की लग्नानंतर पती-पत्नीच्या नात्यात आलेला दुरावा किंवा मतभेद कमी करण्यासाठी केलेला हा एक प्रयत्न असतो परंतु हे पूर्णपणे बरोबर नाही. विवाह समुपदेशन म्हणजे दोन माणसांचे स्वभाव समजून घेणे, त्यानुसार त्यांना विवाहाचा अर्थ सांगणे, त्यांना चांगल्या सामंजस्यासाठी तयार करणे. लग्नाशी निगडीत असे अनेक मुद्दे आहेत, लग्नाआधी जाणून घेतल्यास भविष्यात वैवाहिक आयुष्य चांगले होण्यास मदत होते.

Chanakya Niti : प्रेम संबंधांमध्ये ‘या’ तीन गोष्टींची अवश्य घ्या काळजी; अन्यथा नात्यामध्ये येऊ शकतो दुरावा

सध्याच्या काळात आजूबाजूची परिस्थिती, व्यावहारिक विचारसरणी आणि तुटलेल्या नात्यांमुळे तरुणांना लग्नाचा निर्णय घेताना संभ्रम निर्माण होतो. यामुळेच ते आता विवाहपूर्व समुपदेशनाच्या मार्गाचा अवलंब करत आहेत. या जोडप्यांना लग्नानंतरची आव्हाने जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्यासाठी स्वतःला तयार करण्यासाठी सल्लागाराचे मत हवे आहे. हे बहुतेक उच्च किंवा उच्च मध्यमवर्गीय तरुण आहेत जे कुटुंब आणि नातेवाईकांच्या सल्ल्याऐवजी तज्ञांचा सल्ला घेण्यासाठी येतात.

लग्नाआधीचे समुपदेशन अरेंज मॅरेजमध्ये केले जाते, पण काहीवेळा प्रेमविवाह करणारी मुले-मुलीही पुढील चांगल्या आयुष्यासाठी विवाहपूर्व समुपदेशनासाठी येतात. या दरम्यान त्यांच्या मनात पुढच्या आयुष्याबाबत अनेक प्रश्न असतात, अनेक शंका असतात, याशिवाय काही वेळा एकमेकांच्या स्वभावाबाबत तक्रारी असतात, किंवा कौटुंबिक समस्याही असतात, त्यासाठी ते सल्ला घेतात. आजकाल हा एक ट्रेंड बनला आहे.

More Stories onलग्नMarriage
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The growing trend of youth towards pre marriage counseling reason pvp
First published on: 28-02-2022 at 15:07 IST