Uric Acid: हिवाळा येताच अनेकांना सांधेदुखीची समस्या भेडसावते. सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी लोक शक्य ते सर्व प्रयत्न करतात, तर काही लोक जणूनबुजून किंवा नकळत काही चूक करतात. त्यामुळे सांधेदुखीची समस्या वाढते. हिवाळ्यात युरिक अॅसिडच्या रूग्णांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढल्यावर युरिक अॅसिड लघवीद्वारे बाहेर पडू शकत नाही. अशा परिस्थितीत ही समस्या वाढू शकते. औषधांसोबतच युरिक अॅसिडच्या रूग्णांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. युरिक अॅसिडच्या रूग्णाने काय खाऊ नये ते जाणून घेऊ…
पालक
युरिक अॅसिडच्या रूग्णांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. युरिक अॅसिडच्या रूग्णांनी काही पदार्थ आवर्जून टाळलेच पाहिजेत. यामध्ये विशेषकरून काही भाज्यांचा समावेश आहे. युरिक अॅसिडच्या रूग्णांनी पालक जास्त प्रमाणात खाणे टाळावे, कारण त्यात प्युरिनचे प्रमाण जास्त असते. पालकाचे सेवन केल्याने युरिक अॅसिडची पातळी वाढू शकते. युरिक अॅसिडची पातळी वाढल्याने सांधेदुखी वाढू शकते.
हिवाळ्यात बहुतेक घरांमध्ये वाटाणे आणि बीन्स साधारणपणे शिजवले जातात. असं असताना ज्यांना युरिक अॅसिड आहे, त्यांनी वाटाणे आणि बीन्सचे सेवन कमी प्रमाणात करावे. वाटाणे आणि बीन्समध्ये प्युरिनचे प्रमाणही जास्त असते. हे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने सांधेदुखी वाढू शकते.
वांगी
हिवाळ्यात कोणीही वांग्याची भाजी खात नसला तरी युरिक अॅसिड असलेल्यांनी ते खाण्यापूर्वी दोनदा विचार करा. जास्त प्रमाणात वांगी खाणे धोकादायक ठरू शकते. खरं तर, वांग्याच्या भाजीत प्युरिन असते. वांग्याचे सेवन केल्याने शरीरातील वेदना आणि सूज वाढू शकते.
