आजच्या काळात, खाण्याच्या सवयी व अस्वास्थ्यकर जीवनशैली यांमुळे युरिक अ‍ॅसिडची समस्या खूप वेगाने वाढत आहे. पूर्वी वाढत्या वयानुसार युरिक अ‍ॅसिडसारख्या समस्या सामान्य होत्या; परंतु आता तरुणांनाही युरिक अ‍ॅसिडच्या समस्या अधिक प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे खाण्याच्या सवयी आणि अस्वास्थ्यकर जीवनशैली. एकदा शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढली की, सांधेदुखी, संधिवात इत्यादी समस्या उद्भवू शकतात. जर त्यावर वेळीच नियंत्रण ठेवले गेले नाही, तर हृदयरोग, मूत्रपिंडाचे रोग व मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

खरे तर, युरिक अॅसिड हे शरीरात तयार होणारे एक विष आहे, जे आपल्या सर्वांच्या शरीरात तयार मूत्रपिंड आपल्या कार्याचा भाग म्हणून मूत्राद्वारे शरीरातून हे विषारी पदार्थ काढून टाकते. युरिक अॅसिडची निर्मिती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कारण- ते प्युरीनच्या विघटनाने तयार होते. प्युरीन हे हे रसायन शरीरात नैसर्गिकरीत्या आणि काही पदार्थांमध्येदेखील आढळते. शरीरात युरिक अ‍ॅसिड जास्त प्रमाणात वाढणे आरोग्यासाठी धोकादायक असते. जास्त युरिक अ‍ॅसिडमुळे इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. आयुर्वेद आणि युनानी औषध तज्ज्ञ डॉ. सलीम झैदी यांनी असे काही पदार्थ सुचवले आहेत, जे हाडांमध्ये जमा झालेले सर्व युरिक अ‍ॅसिड बाहेर काढण्यास मदत करू शकतात.

काकडी

युरिक अ‍ॅसिडच्या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी काकडी हा हलका, पाण्यासारखा आणि कमी प्युरिनयुक्त फळे आणि भाज्यांचा पर्याय आहे. काकडीमध्ये ९५% पाणी असते, जे शरीरातील अतिरिक्त विषारी पदार्थ, घाण व युरिक अ‍ॅसिड मूत्राद्वारे बाहेर काढण्यास मदत करते. फक्त काकडी खाणे फायदेशीर आहे; परंतु काकडीचा रस बनवून दिवसभर पिणे अधिक प्रभावी ठरू शकते.

जवाचे पाणी

आयुर्वेदात जव हे शरीरांतर्गत स्वच्छता आणि अनेक रोगांच्या निर्मूलनासाठी उपयुक्त मानले जाते. त्यातील घटक शरीरातील अतिरिक्त युरिक अॅसिड मूत्रमार्गे बाहेर काढण्यास मदत करतात. जर तुम्हाला संधिवात किंवा सांध्यातील सूज आणि वेदना होत असतील, तर दररोज जवाचे पाणी पिण्यास सुरुवात करा. त्याशिवाय जवाचे लापशी खाणेदेखील फायदेशीर आहे. त्याच्या नियमित सेवनाने मूत्रपिंडे चांगले काम करतात आणि शरीर डिटॉक्स होते.

क जीवनसत्त्वाने समृद्ध फळे

यूरिक अ‍ॅसिडच्या प्रभावी उपचारांमध्ये क जीवनसत्त्व हा एक महत्त्वाचा घटक आहे. आवळा, संत्री, लिंबू व पेरू यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. त्यातील अँटिऑक्सिडंट्स शरीरात साचलेले अतिरिक्त युरिक अ‍ॅसिड लघवीद्वारे बाहेर काढण्यास मदत करते. दररोज यांपैकी एखादे फळ खाल्ल्याने युरिक अ‍ॅसिड कमी होतेच. त्याशिवाय रोगप्रतिकार शक्तीही वाढते.

पुरेसे पाणी प्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जर युरिक अ‍ॅसिड वाढले, तर ते नैसर्गिकरीत्या काढून टाकण्याचा सर्वांत सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे पुरेसे पाणी पिणे. दररोज २.५ ते ३ लिटर पाणी पिल्याने मूत्रपिंडे सक्रिय राहतात आणि युरिक अ‍ॅसिड लघवीद्वारे सहज बाहेर टाकले जाते. तुम्ही साखर न घालता, साधे पाणी किंवा लिंबू पाणीदेखील पिऊ शकता. कारण- ते शरीरात अल्कधर्मी वातावरण तयार करते.