Benefits of Surya Namaskar: आजकाल वेगाने बदलणाऱ्या जीवनशैलीत आणि धावपळीच्या जीवनामुळे अनेक लोक त्रस्त असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमचा दिवस चांगल्या रीतीने व्यतीत करायचा असेल, तर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात योगाभ्यासाने करू शकता. योगामध्ये अनेक प्रकारची आसने असली तरी जर तुम्हाला सोपी योगासने करायची असतील, तर तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता.
सूर्यनमस्कार हा केवळ योगाभ्यास नाही, तर निरोगी जीवनाकडे वाटचाल करण्याने एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. जर तुम्ही सतत ३० दिवस सूर्यनमस्कार केलेत, तर त्यामुळे तुमचे शरीर निरोगी आणि मन शांत होईल.
सूर्यनमस्काराचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे:
शरीर सुडौल व मजबूत होते
सूर्यनमस्कार हा एक संपूर्ण व्यायाम आहे, जो केल्याने शरीराचे स्नायू सक्रिय होतात. सूर्यनमस्कारात एकूण १२ आसने आहेत, जी केल्याने शरीर सुडौल आणि मजबूत बनते. यामुळे मन एकाग्र करण्याचीही क्षमता वाढते.
शरीर लवचिक बनते
सूर्यनमस्कार केल्याने शरीर लवचिक होते. असे केल्याने पाठीचा कणा, खांदे, पाठ, कंबर व पायांमध्ये लवचिकता येते. ३० दिवस सतत केल्याने शरीरातील कडकपणा कमी होतो.
सांधे मजबूत होतात
सूर्यनमस्कार केल्याने शरीराचे स्नायू मजबूत होतात आणि सांधेदुखी कमी होते. जर तुम्ही महिनाभर नियमितपणे सूर्यनमस्कार केलेत, तर तुम्हाला अनेक फायदे होतात. त्यामुळे संधिवात आणि सांधेदुखीची शक्यतादेखील कमी होते.
पचनक्रिया चांगल्या प्रकारे सुधारते
सूर्यनमस्कारामुळे पोटाच्या स्नायूंना मालिश मिळाल्यामुळे गॅस, अपचन व बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळतो. ३० दिवस सूर्यनमस्कार केल्याने पचनक्रिया चांगल्या प्रकारे सुधारते.
त्वचा उजळते
जर तुम्ही दररोज नियमितपणे सूर्यनमस्कार केलेत, तर तुमची त्वचादेखील उजळते. सूर्यनमस्कारांमुळे रक्तप्रवाहात सुधारणा होते, ज्यामुळे चेहऱ्यावर चमक येते. हा व्यायाम त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करतो. असे केल्याने मुरमे आणि सुरकुत्यादेखील दूर होतात.
एकाग्रता वाढवण्यासाठी फायदेशीर
सूर्यनमस्कार केल्याने एकाग्रता वाढते. जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा ऑफिसमध्ये काम करीत असाल, तर तुम्ही सूर्यनमस्कार अवश्य करा. त्यामुळे मानसिक ताण कमी होऊन, मन शांत होते. तसेच, आपल्यामध्ये मानसिक स्पष्टता येऊन, मन एकाग्र करण्याची क्षमता वाढते.