scorecardresearch

स्पर्म काउंट वाढवण्यासाठी हे चार पदार्थ ठरतात प्रभावी; आजच आहारात समावेश करा

शुक्राणूंची गुणवत्ता हा प्रजननक्षमतेवर परिणाम करणाऱ्या प्रमुख घटकांपैकी एक आहे.

Sperm_count
स्पर्म काउंट वाढवण्यासाठी हे चार पदार्थ ठरतात प्रभावी; आजच आहारात समावेश करा (Photo : Pexeles)

शुक्राणूंची गुणवत्ता हा प्रजननक्षमतेवर परिणाम करणाऱ्या प्रमुख घटकांपैकी एक आहे. वीर्य गुणवत्ता कमी होण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अनेक संशोधनांच्या निष्कर्षांवर आधारित असे मानले जाते की, याला पर्यावरणीय किंवा पौष्टिक घटक कारणीभूत असू शकतात. भारतात वंध्यत्वाची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. शुक्राणू कमी आणि गतिशीलता कमी असणं ही पुरुषांमधील वंध्यत्वाची मुख्य कारणे आहेत. मानवी शरीरातील इतर कोणत्याही अवयवाप्रमाणे प्रजनन प्रणाली शरीराला मिळणाऱ्या पोषक आणि जीवनसत्त्वांवर अवलंबून असते. खाद्यपदार्थांमुळे एखाद्या व्यक्तीच्या पुनरुत्पादक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. पुरुषांच्या इन्फर्टिलिटीत आहार महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

अनेक अभ्यासांमध्ये हे सिद्ध झाले आहे की पुरूषांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढवून उत्तम आहार घेतल्यास त्यांची प्रजनन क्षमता सुधारली जाऊ शकते. चांगला आहार टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन वाढवू शकतो, ज्यामुळे शुक्राणूंची संख्या तसेच शुक्राणूंची गतिशीलता आणि गुणवत्ता वाढू शकते. स्पर्म काउंट वाढवण्यासाठी आहार घ्यायला हवा जाणून घेउयात.

व्हिटॅमिन डी: व्हिटॅमिन डी सूर्यप्रकाशातून मिळते आणि पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढवण्यास मदत करते. व्हिटॅमिन डी लैंगिक हार्मोन्स प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनची पातळी वाढवते, ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते. याशिवाय अंडी, दुग्धजन्य पदार्थ, चिकन, मासे हे देखील व्हिटॅमिन डीचे प्रमुख स्त्रोत आहेत.

ओमेगा 3 फॅटी ऍसिडस्: आरोग्य तज्ञांच्या मते, सॅल्मन आणि फ्लेक्ससीड्समध्ये आढळणारे ओमेगा -3 प्रजनन क्षमता वाढविण्यात आणि गर्भपाताचा धोका कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. जर प्रजनन क्षमता वाढवायची असेल, तर आहारात ओमेगा-३ असलेल्या पदार्थांचा समावेश केला पाहीजे.

‘या’ पाच कारणांमुळे पुरुषांच्या वीर्यामध्ये शुक्राणू होतात कमी; स्पर्म काउंट वाढण्यासाठी काय करायचं?, जाणून घ्या

दुग्धजन्य पदार्थ : दुधात सर्व पोषक घटक असतात. दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने प्रजनन क्षमता वाढते. त्यामुळे तुमच्या आहार चार्टमध्ये दूध, दही, लोणी, चीज यांचा समावेश करा. जर तुम्हाला दूध प्यायला आवडत नसेल तर तुम्ही बटर आणि पनीरचे सेवन करू शकता.

गाजर : हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना संशोधनात आढळून आले की, गाजरात आढळणारे घटक पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यास मदत करतात. संशोधनानुसार, गाजरांमध्ये कॅरोटीन नावाचे रसायन आढळते, जे केवळ शुक्राणूंची संख्या वाढवत नाही तर त्यांची गुणवत्ता देखील सुधारते. सर्व केशरी आणि पिवळ्या भाज्यांमध्ये हा गुणधर्म असल्याचेही या संशोधनात म्हटले आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2021 at 14:27 IST
ताज्या बातम्या