मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण जेव्हा ती अनियमित होते तेव्हा ती समस्या बनते. कधी कधी आपल्याला याचे कारणही कळत नाही. बहुतेक स्त्रिया या समस्येकडे दुर्लक्ष करतात आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्नही करत नाहीत. असे करून त्यांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे असे दिसून आल्यास त्यावर वेळीच लक्ष देणे गरजेचं आहे. तर जाणून घ्या मासिक पाळी उशीरा येण्याची कारणे आणि त्यावरील फायदेशीर उपाय. ज्याचा अवलंब करून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.

‘या’ कारणांमुळे मासिक पाळी उशीरा येऊ शकते

ताण

प्रत्येक महिलांना कुठल्या न कुठल्या गोष्टीचे टेन्शन हे असतेच. कधी कामाचे टेन्शन तर कधी कुटुंबाचे टेन्शन. जर तुम्हीही जास्त टेन्शन घेत असाल तर आजच ही सवय सोडा कारण याचा शरीरावर अनेक प्रकारे वाईट परिणाम होऊ शकतो. जास्त तणावामुळे GnRH नावाच्या संप्रेरकाचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे ओव्हुलेशन किंवा मासिक पाळी येत नाही. त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नये.

( हे ही वाचा: किडनी स्टोन असल्यास ‘या’ गोष्टी नक्की खा; लवकरच समस्येपासून सुटका मिळेल)

आजार

मासिक पाळी येण्याचे एक कारण आजार देखील असू शकते. अचानक येणारा ताप, सर्दी, खोकला किंवा कोणत्याही दीर्घ आजारामुळेही मासिक पाळीला उशीर होऊ शकतो. हे जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा घडते आणि एकदा का तुम्ही आजारातून बरे झालात तर तुमची मासिक पाळी पुन्हा नियमित होते.

वेळापत्रकात बदल

बदलत्या वेळापत्रकामुळे, बदलत्या शिफ्टमध्ये काम करणे, गावाबाहेर जाणे किंवा घरातील लग्न किंवा समारंभ यामुळे अनेक वेळा आपला दिनक्रम बदलत राहतो. या कारणास्तव मासिक पाळीच्या तारखा देखील वर आणि खाली जाऊ शकतात. पण, एकदा का शरीराला या वेळापत्रकाची सवय झाली की मासिक पाळी देखील नियमित होते.

पाहा व्हिडीओ –

( हे ही वाचा: गरोदरपणाची लक्षणे दिसूनही रिपोर्ट निगेटिव्ह येत आहेत? मग जाणून घ्या यामागची मुख्य कारणे)

मासिक पाळीच्या विलंबावर ‘हे’ उपचार करा

एक निश्चित दिनचर्या पाळा

मासिक पाळी येण्यास उशीर होण्याची सर्व कारणे लक्षात घेऊन दैनंदिन दिनचर्यावर विशेष लक्ष ठेवणे गरजेचं आहे. याशिवाय तुम्ही जास्त ताणतणाव तर घेत नाही ना यावर देखील विशेष लक्ष ठेवा. नियमित व्यायाम, प्राणायाम करा आणि मॉर्निंग वॉकसाठी जा, जेणेकरून शरीरामध्ये पुरेपूर ऑक्सिजन प्रवाहित होईल. त्याचबरोबर चांगला आहार ठेवा, ज्यामध्ये सर्व प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतील. तसेच पुरेशी झोप घ्या, ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील.

वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा

वाढत्या वजनामुळे शरीराला जास्त इन्सुलिन तयार करावे लागते, त्यामुळे मासिक पाळीला उशीर होतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा, यासाठी व्यायामासोबतच असा आहार घ्या, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.