निरोगी राहण्यासाठी डाएटमध्ये फळांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. फळांमध्ये अनेक पोषकतत्त्व आढळतात जी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. पण फळं खाताना आपण काही चुका करतो ज्यामुळे फळांमधील पोषकतत्त्व वाया जाऊ शकतात. कोणत्या आहेत त्या चुका जाणून घ्या.

फळं खाताना या चुका करणे टाळा

आणखी वाचा: सकाळी चेहरा धुताना कोणते पाणी वापरावे थंड की गरम? जाणून घ्या Skin Care बाबतच्या महत्त्वाच्या गोष्टी

वेगवेगळ्या प्रकारची फळं एकत्र खाऊ नका
वेगवेगळ्या प्रकारची फळं एकत्र खाल्ल्याने शरीरात विषारी पदार्थांची निर्मिती होऊ शकते, ज्याचा परिणाम पचनक्रियेवर होतो. त्यामुळे गोड फळांबरोबर गोड फळं आणि आंबट फळांबरोबर आंबट फळं खाण्याची सवय लावा.

रात्री फळं खाणे टाळा
रात्री झोपण्यापुर्वी २ ते ३ तास आधी काहीही न खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यातच फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, रात्रीच्या वेळी फळं खाल्ल्याने झोपेत व्यत्यय येऊ शकतो. तसेच यामुळे ॲसिडीटी होऊ शकते.

आणखी वाचा: सतत लॅपटॉपवर काम केल्याने डोळे दुखतात का? या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

फळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका
फळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो, कारण यामुळे शरीरातील पीएच पातळीचे प्रमाण बिघडू शकते. विशेषतः जास्त पाणी असणारी फळं टरबूज, कलिंगड, संत्री, काकडी अशी फळं खाऊन पाणी प्यायल्याने डायरिया किंवा कॉलरासारखे आजार होऊ शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फळांची साल काढू नका
अनेकजण ज्या फळांच्या साली खाता येतात, त्या फळांच्या सालीही काढून टाकतात. पण यामुळे फळांच्या सालीमध्ये असणारी पोषकतत्त्व वाया जातात. फळांच्या सालींमध्ये महत्त्वाचे विटामिन्स आणि अँटिऑक्सिडंट आढळतात. त्यामुळे फळांची साल न काढण्याचा सल्ला दिला जातो.