प्रत्येकाला आपले केस सुंदर, लांब आणि घनदाट असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण केस गळण्याची आणि पातळ होण्याच्या समस्येने अनेक लोकं खूप त्रस्त आहेत. तर कोणत्या चुकांमुळे केस गळत आहेत, तसेच पातळ होतात हे देखील काहींना कळत नाही. चला तर मग जाणून घेऊयात तुमचे केस कोणत्या चुकांमुळे पातळ होऊ लागतात.

या चुकांमुळे तुमचे केस होतात पातळ

हेअर प्रोडक्ट

केमिकलयुक्त हेअर प्रोडक्ट वापरल्याने केस खराब होतात. आजकाल स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारचे हेअर केअर प्रोडक्ट्स वापरतात, ज्यामुळे केस खराब तर होतातच पण सोबतच गळण्याची समस्या उद्भवते. यामुळे केस पातळ होऊ लागतात.

शॅम्पूचा जास्त वापर करणे

जास्त शॅम्पू केल्याने केस पातळ होऊ शकतात. शॅम्पूमध्ये केमिकलचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे शॅम्पूचा जास्त प्रमाणात वापर केल्यास केस पातळ तर होतातच पण गळूही लागतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिटॅमिन डीची कमतरता

शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्याने देखील केस अधिक गळतात आणि पातळ होतात. यासाठी महिलांनी सकाळी सूर्यप्रकाश घेणे आवश्यक आहे. तसेच सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात न घेतल्याने शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होते, त्यामुळे केस पातळ तर होतातच पण गळूही लागतात. अन्नामध्ये आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असताना देखील ही समस्या उद्भवू शकते. अनेकदा ते त्यांच्या वजनाबाबत खूप जागरूक असतात, त्यामुळे ते त्यांच्या आहारातून आवश्यक पोषक घटक काढून टाकतात, ज्याचा परिणाम केसांवर होतो आणि त्यामुळे केस पातळ होऊ शकतात.