Best Flour for Diabetics: भारतातील अनेक जण हे मधुमेहग्रस्त आहेत. मधुमेह हा जीवनशैलीमुळे झपाट्याने वाढणारा आजार आहे. मधुमेह असलेल्या लोकांना विशेषत: उच्च किंवा कमी रक्तातील साखरेचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. आजकाल मधुमेह, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी-जास्त होणे ही सामान्य बाब झाली आहे. रक्तातील साखर नियंत्रणात नसेल, तर इतर अवयवांसह एकंदरीत आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.

अनियमित दिनचर्या, असंतुलित खाणे आणि व्यायामाचा अभाव; यामुळे लोकांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. मधुमेह हा आजार लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम करतो. डायबिटीस दोन प्रकारचा असतो. एक टाइप १ आणि दुसरा टाइप २. हा एक असा आजार आहे, ज्याचा किडनी आणि हृदयाच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो किंवा त्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतील. अशा वेळी शरीरातील शुगर लेवल मर्यादेपेक्षा जास्त वाढली असेल तर कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करता डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा आणि योग्य ते उपचारसुद्धा करणे गरजेचे आहेत. तुमचे आयुष्य सुरक्षित ठेवायचे असेल तर रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का की, रोजच्या जेवणातल्या एका चुकीमुळे तुमचे ब्लड शुगर झपाट्याने वाढू शकते आणि ती चूक म्हणजे रिफाइंड गव्हाच्या पिठाची पोळी.

साधारणतः आपण गव्हाचे पीठ चाळून, त्यातील चोकर वेगळा करून फक्त स्वच्छ दिसणारं पीठ वापरतो. पण, हा चोकर म्हणजेच फायबरचा मुख्य स्रोत आहे. जेव्हा आपण फक्त कार्बोहायड्रेटयुक्त पीठ वापरतो, तेव्हा अशा पोळीमुळे ब्लड शुगर क्षणार्धात वाढते. याचा ग्लायसेमिक इंडेक्स फारच जास्त असतो, म्हणजे हे लवकर पचतं आणि रक्तात साखर झपाट्याने वाढते.

पोळीच्या पिठात ‘या’ दाण्याचं पीठ मिसळा

या पार्श्वभूमीवर आयुर्वेद औषधांचे जाणकार डॉ. सलीम जैदी यांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. ते सांगतात की, गव्हाच्या पिठात चोकरासह मेथी दाण्याचं पीठ मिसळून खाल्ल्यास, ते एक ‘मेडिसिनल पोळी’ बनते. मेथीमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे ती कार्ब्सचं शोषण हळूहळू करते, जे इन्सुलिनच्या निर्मितीला सहकार्य करतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कशी बनवाल ही पोळी?

एक कप गव्हाच्या पिठात एक चमचा मेथीच्या दाण्याचं पीठ टाका, नीट मिक्स करून पीठ मळा आणि नेहमीप्रमाणे पोळी बनवा. ही पोळी दिवसातून दोन वेळा खाल्ल्यास, वाढलेली शुगर नियंत्रित राहण्यास मदत होते. विशेष म्हणजे, औषधांशिवायही शुगर नॉर्मल होण्याची शक्यता निर्माण होते.