why women need strength training : अनेकदा महिला आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही. दररोजच्या धावपळीत त्या आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात पण महिलांनी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. न्युट्रिनशनिस्ट नुपूर पाटील यांनी महिलांनी स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे किती आवश्यक आहे, याविषयी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी महिलांनी स्ट्रेंथ ट्रेनिंग का करावी, याचे तीन कारणे सांगितले आहेत. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या.
न्युट्रिनशनिस्ट नुपूर पाटील सांगितल्याप्रमाणे –
१. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे हृदयाशी संबंधीत आजारांचा आणि मधुमेहाचा धोक कमी होतो. याशिवाय खराब कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत होते.यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीत आरोग्य चांगले राहते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.
२. स्ट्रेंथ ट्रेनिंग नियमित केल्यामुळे दुखापत, पाठदुखी किंवा संधिवाताचा त्रास कमी होतो. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे फक्त स्नायू मजबूत होत नाही तर हाडे सुद्धा मजबूत होतात.
हेही वाचा : हिवाळ्यात पेरू खाताय? ह्रदयाचे आरोग्यापासून वजन कमी करण्यापर्यंत, जाणून घ्या पेरूचे अनेक फायदे
३. स्ट्रेंथ ट्रेनिंगचा फायदा मानसिक आरोग्यावरसुद्धा होतो. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे तणाव कमी होतो आणि मूड सुद्धा सुधारतो.यामुळे नैराश्याचा धोका कमी होतो. ज्या महिला स्ट्रेंथ ट्रेंनिगचे प्रशिक्षण घेतात त्या खूप आत्मविश्वासू आणि सक्षम असतात.
नुपूर पाटील यांनी nupuurpatil या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ही पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओवर त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलेय, “महिलांनो, या तीन कारणांमुळे तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग सुरू करायला पाहिजे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान”