घरात पाल पाहूनच किळसवाणे वाटते, आणि अंगावर काटा देखील येतो. तिला हाकलने ही तारेवरची कसरतच आहे. मात्र, घरात तिची उपस्थिती ही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे तुमच्या घरात जर अधिक पाली असतील, आणि त्यापासून तुम्ही परेशान झाले असाल तर त्यांना पळवून लावण्यासाठी काही उपाय आहेत. या उपायांबाबत आपण जाणून घेऊया.

१) अंड्याची साल

man died due to lightning fall in unseasonal stormy rain
बुलढाणा : वादळी पाऊस, गारपीटपासून जीव वाचवण्यासाठी ‘पोकलॅन’खाली आसरा घेतला; मात्र…
heavy traffic jam for two hours in dombivli
डोंबिवली दोन तासांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडीत; रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना फटका
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
Loksatta Lokrang Where did these insults on Holi originate and how did they develop
निमित्त: शिव्या-महापुराण

अंड्याची साल ही पालीला घरापासून दूर ठेवण्यात मदत करू शकते. अंड्याची साल अशा ठिकाणी ठेवा जिथे तुम्हाला पाल येण्याची शक्यता अधिक वाटते. अंड्याच्या सालीची वास पालीला पळवून लावण्यात मदत करू शकते.

(काट्याने काढला काटा.. शास्त्रज्ञांनी डासांद्वारे दिली मलेरियाची लस, दिसला ‘हा’ परिणाम)

२) कळी मिरीपासून अ‍ॅलर्जी

काळ्या मिरीचे पावडर पाण्यात विरघळवून ठेवा. ज्या ठिकाणी पाल अधिक येते त्या ठिकाणी या पाण्याची फवारणी करा. तुम्ही लाल मिर्ची पावडरचा देखील वापर करू शकता.

३) कांदा आणि लसूणचा वापर

कांद्याची साल पाल हाकलण्यास मदत करू शकते. यासाठी कांद्याची साल घरातील कानाकोपऱ्यात ठेवा. त्याचबरोबर, लसणाच्या कळ्या खिडकी आणि दरवाज्यांना लटकवा. याने पाल घरापासून दूर राहण्यास मदत होईल.

(युरीन इन्फेक्शन कमी करण्यात मदत करू शकतो ‘हा’ फळ, इतरही समस्यांमध्ये लाभदायी)

४) पालीवर थंड पाणी टाका

पालीला थंडी आवडत नाही. त्यामुळे पाल दिसल्यास तुम्ही तिच्यावर थंड पाणी शिंपडा. याने ती पळून जाईल.

५) कॉफी आणि काथ पावडरचा वापर

कॉफी पावडर आणि काथचे पेस्ट बनवा. या पेस्टच्या छोट्या गोळ्या बनवून त्या ज्या ठिकाणी पाल येते त्या ठिकाणी ठेवा. या गोळ्यांतून येणारा वास पालीला घरापासून दूर ठेवण्यात मदत करते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)