सोशल मीडिया हा सध्या अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे. यातही व्हॉटसअॅपशिवाय जगण्याचा अनेक जण विचारही करु शकत नाहीत. एखादा महत्त्वाचा निरोप देण्यापासून ते परदेशातील व्यक्तीशी संपर्क करण्यापर्यंत अनेक कामे व्हॉटसअॅपमुळे सोपी झाली आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांमध्ये प्रसिद्ध असलेले हे अॅप्लिकेशन वापरणे जास्तीत जास्त सोपे व्हावे यासाठी कंपनीकडून सातत्याने नवनवीन बदल करण्यात येत आहेत. २०१८ या वर्षात व्हॉट्सअॅपने आणलेली फिचर्स जाणून घेऊयात…

व्हॉट्स अॅप ग्रुप व्हिडिओ कॉल –
२०१८ मध्ये व्हॉट्स अॅपने ग्रुप व्हिडिओ कॉलिंग फीचर आणलं आहे. व्हॉट्स अॅप अपडेट केल्यानंतर ग्रुप व्हिडिओ कॉलिंगचा पर्याय दिसेल. व्हॉटस अॅप ग्रुप व्हिडिओ कॉलिंग हे फक्त अमुक एका व्हॉट्स अॅप ग्रुपमधल्या लोकांना जोडण्यासाठी तयार करण्यात आलं आहे असा जर तुमचा समज असेल तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. ग्रुप व्हिडिओ कॉलिंगमध्ये फक्त चार युजर्सच एका वेळी बोलू शकणार आहेत.

पेमेंट फीचर –
पेमेंट फीचरमुळे डिजीटल व्यवहार करता येणार आहे. युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI)वर ही प्रणाली असून त्याद्वारे पैसे पाठवता किंवा स्विकारता येणार आहेत. यासाठी दोघांकडे युपीआय पेमेंटचा पर्याय असणं मात्र आवश्यक असणार आहे. या फीचरसाठी व्हॉट्स अॅपने आयसीआयसीआय, एचडीएफसी, अॅक्सिस, एसबीआय, यस बँक या बँकांसह देशातील इतरही मोठ्या बँकांशी करार केला आहे.

whatsapp stickers –
इतर मेसेजिंग अॅपच्या तुलनेत व्हॉट्स अॅपमध्ये काही फीचर्स कमी आहेत. हेच हेरून व्हॉट्स अॅपनं हे फीचर आणलं आहे. इमोजीव्यतिरिक्तही वेगळे आणि आकर्षक असे हे स्टिकर्स असणार आहे. व्हॉट्स अॅप बिटा व्हर्जनवर हे स्टिकर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे हे स्टिकर्स वापरायचे असतील तर व्हॉट्स अॅप अपडेट करणं गरजेचं आहे.

पिक्चर इन पिक्चर –
WhatsAppने आपल्या युजर्सला एक भन्नाट फिचर आणले आहे. व्हॉट्स अॅपवर आपल्याला विविध व्हिडीओच्या लिंक्स येत असतात. ते पाहण्यासाठी आपल्याला दुसऱ्या ब्राऊजरवर जावं लागत असे. मात्र, आता व्हॉट्स अॅपने यावर तोडगा काढला आहे. आता नव्या अपडेटनुसार व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ पाहता येणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी याची चाचणी करण्यात आली होती. ती आता सर्वांसाठी उपलब्ध होत आहे. याला Picture-in-Picture (PIP) (पिक्चर इन पिक्चर) मोड असं म्हटलं जातं आहे. ज्यामुळे व्हॉट्स अॅप बाहेर न जात बाकीचे संदेश पाहत आपण त्या लिंकवरील व्हिडीओ व्हॉट्स अॅपमध्येच पाहू शकतो.

‘डिलिट फॉर एव्हरिवन’ –
आपल्याकडून चुकून एखादा मेसेज नको त्या व्यक्तीला गेल्यानंतर तो संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच डिलिट किंवा अनसेंड करता आला तर असा विचार अनेकांच्या मनात होता. याबद्दल अनेकांनी व्हॉट्सअॅपजवळ अशाप्रकारच्या फीचरची मागणीही केली होती. सप्टेंबर महिन्यात या फीचरची चाचणी व्हॉट्सअॅपने केली होती आणि बऱ्याच प्रतिक्षेनंतर अखेर ते फीचर लाँचही करण्यात आले. अशाप्रकारे मेसेज रिकॉल करण्याचा कालावधी सुरुवातीला ७ मिनिटे आहे. समोरच्याला मेसेज डिलीट केल्याची रिक्वेस्ट १ तास ८ मिनिटे आणि १६ सेकंदात मिळणे आवश्यक आहे.

फॉरवर्डला लगाम –
व्हॉट्स अॅपनं ‘फॉरवर्ड मेसेज’ हे फीचर आणलं होतं. या फीचरमुळे ‘मुळ मेसेज’ आणि ‘फॉरवर्ड मेसेज’ यामधील फरक ओळखणं सहज शक्य झालं.

या फिचरशिवाय व्हॉट्स अॅपने २०१८ मध्ये व्हाइस कॉलिंग, स्विप टू रिप्लाय, डार्क मोड यासारखे अनेक फिचर्स आणले आहेत.