Tulsi Vivah 2025 Samagri List In Marathi : भाऊबीज व पाडव्याच्या नंतर दिवाळीचे मुख्य दिवस समाप्त होत असले तरी तुळशीच्या लग्नानंतरच खऱ्या अर्थाने दिवाळीची सांगता होते. चार महिन्यांपासून योगनिद्रामध्ये असलेले भगवान विष्णू १ नोव्हेंबर रोजी जागे होतील. हा दिवस तुळशी विवाह म्हणूनही साजरा केला जातो. तुळशी विवाह म्हणजे तुळशीचे रोप (वृंदा) आणि भगवान विष्णूचे शालिग्राम रूप (कृष्ण/विष्णू) यांचा विवाह लावण्याचा सोहळा. या दिवशी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुळशी विवाह पार पडतात, तर यंदा तुळशी विवाह कधी असणार, तुळशी विवाहासाठी काय साहित्य लागणार, याबद्दल बातमीतून जाणून घेऊयात…
तुळशी विवाह शुभ मुहूर्त
वैदिक पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी २ नोव्हेंबर २०२५ ला सकाळी ७ वाजून ३१ मिनिटांनी सुरू होईल ते ३ नोव्हेंबर २०२५ ला पहाटे ५ वाजून ७ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे तिथीनुसार तुळशी विवाह उत्सव रविवारी २ नोव्हेंबर २०२५ रोजी असणार आहे.
तुळशी विवाहसाठी साहित्य
- तुळस
- धोतऱ्याच्या आणि एरंडाच्या झाडाची फांदी
- आंब्याच्या झाडाचे पान, विड्याची पाने
- आवळा, चिंच, बोरं
- हळकुंडे
- विड्याची पाने
- सुपार्या
- खोबर्याच्या वाट्या
- हळद-कुंकू आणि तांदूळ
- ऊस
- नारळ
- पंचा / अंतरपाट
- हार
- सुगंधित फुले
- पाट
- कृष्णाची छोटी मूर्ती
- मंगलाष्टका पुस्तक
- डोक्यात घालण्यासाठी टोपी
- प्रसादासाठी – ऊस, कुरमुरे, लाह्या, बत्ताशे, शेवबुंदी, फराळातील पदार्थ इत्यादी.
तुळशी विवाहाची तयारी कशी करावी?
- तुळशी विवाहाची तयारी कशी करावी?
- दाराबाहेर केर काढून घ्या.
- घराबाहेर जागा किंवा अंगण सारवून स्वच्छ करा आणि तुमच्या आवडीची छान रांगोळी काढा.
- रांगोळी काढून झाल्यानंतर तुळशीची कुंडी सजवायला घ्या.
- सगळ्यात पहिले हळद, मग कुंकवाचे ठिपके कुंडीवर सगळ्या बाजूने लावून घ्या.
- त्यानंतर तुळशीत चिंचा, आवळे आणि ऊस खोचून ठेवा.
- नंतर आजूबाजूचा परिसर सुंदर रांगोळी आणि फुलांनी सजवून घ्या.
- त्यानंतर पाट अक्षता आणि फुलांनी सजवून घ्या आणि पाटाच्या मधोमध कृष्णाची छोटी मूर्ती ठेवा.
- तुळशीसमोर पंचा धरून पलीकडे कृष्णाची मूर्ती ठेवलेला पाट घेऊन एका व्यक्तीला उभे करावे.
- मंगलाष्टके म्हणावी, नंतर सर्वांनी वृंदावनावर अक्षता टाकून टाळ्या वाजवाव्या, वाद्ये वाजवावी.
- त्यानंतर पाट घेऊन उभा असणाऱ्याने एक फुलांचा हार कृष्णाला व दुसरा फुलांचा हार तुळशीला घालावा.
- नंतर नारळ फोडून तुळशी व श्रीकृष्णाची आरती करावी.
- त्यानंतर प्रसाद वाटावा.
- अशाप्रकारे तुळशी विवाह संपन्न होईल.
