सध्या बाजारात वेगवेगळ्या कंपन्याचे नवनवीन फिचर असलेले टीव्ही पाहायला मिळतात. आता तर ‘कोडॅक’, ‘टीसीएल’, ‘बीपीएल’ आणि ‘मायक्रोमॅक्स’ या कंपन्यांनी तर केवळ १० हजार रुपयांमध्ये ३२ इंची टीव्ही बाजारात आणले आहेत. या व्यतिरिक्त ‘जेव्हीसी’ आणि ‘शिंको’ कंपनीने देखील चांगले फिचर असणारे कमी किमतीचे टीव्ही बाजारात लॉन्च केले आहेत. चला जाणून घेऊया १० हजार रुपयांमध्ये मिळणारे टीव्ही

जेव्हीसी 32N380C फुल HD LED TV

या टीव्हीची किंमत फक्त ९,९९९ रुपये आहे. या टीव्हीला ब्लूटूथ हा ऑप्शन देण्यात आला आहे. तसेच हा टीव्ही एचडी आहे. हा टीव्ही फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

टीसीएल 32D3000 एचडी रेडी LED TV

या टीव्हीची किंमत ९,९९९ रुपये आहे. हा टीव्ही अॅमेझॉनवर विक्रिसाठी उपलब्ध असून २८ इंचाच्या टीव्हीची किंमत फक्त ८,९९९ रुपये आहे. तसेच ४० इंचाच्या टीव्हीची किंमत १६,४९९ रुपये आहे. या टीव्हीला 16W चा साउंड आउटपूट देण्यात आला आहे.

मायक्रोमॅक्स ३२ इंची एचडी रेडी LED

मायक्रोमॅक्सच्या या टीव्हीची किंमत ९,९९९ रुपये आहे. या टीव्हीची विक्री अॅमेझॉनवर सुरू आहे. या टीव्हीला दोन HDMI पोर्ट देण्यात आले असून एचडी रिजोल्यूशन देण्यात आले आहे.

बीपीएल T32BH3A LED TV

या टीव्हीची किंमत ९,४९९ रुपये असून या टीव्हीला दोन HDMI पोर्ट देण्यात आले आहेत. टीव्हीला बिल्ड इन स्पीकर्स देण्यात आले आहेत.

नोबल स्कियोडो R-32 एचडी LED TV

या टीव्हीची किंमत ८,४९९ रुपये आहे. हा टीव्ही अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या टीव्हीमध्ये इनबिल्ड सिनेमा झूम हे फिचर देण्यात आले आहे. या फिचरद्वारे एखादी गोष्ट झूम करुन पाहिली जाऊ शकते.