‘टेस्ट अॅटलास’ या फूड अॅण्ड ट्रॅव्हल गाईडने खीर व फिरणी या भारतातील दोन पारंपरिक गोड पदार्थांचा ‘जगातली सर्वोत्तम १० खिरींमध्ये’ समावेश केआहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे.तांदळाचे पीठ, दूध, साखर व वेलची यांच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या उत्तर भारतातील फिरणीने सातवा क्रमांक मिळवला आहे.तर, सणासुदीच्या दिवसांत घराघरांतून तयार होणाऱ्या खिरीने दहावे स्थान मिळवले आहे. त्यात दूध व तांदूळ हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. खिरीची चव ही इतर घटकांवर म्हणजेच सुका मेवा, फळे आणि इतर गोष्टींवर ठरते.

भारताव्यतिरिक्त अजून कोणकोणते देश व पदार्थ या यादीत आहे ते पाहू.

पहिल्या क्रमांकावर इराणचा शोले जर्द (Sholeh Zard) हा तांदूळ व केशर वापरून बनवलेला गोड पदार्थ आहे. या पदार्थावर शेवटी दालचिनीची पूड, चांदीचा वर्ख लावलेले बदाम किंवा पिस्त्याची सजावट केल्याने बघताच क्षणी तो मनात भरतो.

D gukesh
‘टोरंटोत भारतीय भूकंप’; कँडिडेट्स’ विजेत्या गुकेशचे कास्पारोवकडून कौतुक; विजयाचे श्रेय आनंदलाही
shoe sizing system in india
भारतात येणार नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’, ‘भा’ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
The forts in the state are in the grip of private encroachments Pune
राज्यातील किल्ले खासगी अतिक्रमणांच्या विळख्यात… आता होणार काय?
BJP Politics in Tamil Nadu blending caste and faith
तमिळनाडूमध्ये जात व धर्माची मोट बांधण्याचा भाजपाचा प्रयत्न! काय आहे परिस्थिती?

हेही वाचा : मुंबईचा हा कुत्रा चक्क सायकलने करतो २० किलोमीटर प्रवास; Video होतोय व्हायरल

भारताव्यतिरिक्त अजून कोणकोणते देश व पदार्थ या यादीत आहे ते पाहू.
पहिल्या क्रमांकावर इराणचा शोले जर्द (Sholeh Zard) हा तांदूळ व केशर वापरून बनवलेला गोड पदार्थ आहे. या पदार्थावर शेवटी दालचिनीची पूड, चांदीचा वर्ख लावलेले बदाम किंवा पिस्त्याची सजावट केल्याने बघताच क्षणी तो मनात भरतो.

इटलीच्या जगप्रसिद्ध व सर्वांच्या लाडक्या पन्ना कोटा हे आठव्या क्रमांकावर असून, तुर्कीच्या काही अप्रतिम पदार्थांनी या यादीत तीन जागा पटकावल्या आहेत. त्यापैकी गुलाब पाणी किंवा व्हॅनिलाच्या चवी असलेला ‘फिरीन सॉटलक’ (Firin sutlac) हा पदार्थ दुसऱ्या स्थानावर आहे. हा एक तुर्की पदार्थ असून तांदळाच्या खिरीचा एक प्रकार आहे जो ओव्हनमध्ये बनवला जातो. ‘कजानडीबी’ (Kazandibi) या पदार्थाला पाचवे स्थान तर, चिकन वापरुन बनवलेला ‘तावुक गोगसुला’ (Tavuk gogsu) नववे स्थान देण्यात आले आहे.