थंड हवा आणि बाहेर वाढणारे प्रदूषण हे आपल्या नाजूक त्वचेचे सर्वात जुने शत्रू आहेत. या दोन्ही गोष्टींचा सामना करण्यासाठी जर तुम्ही घरी बसला असाल आणि सर्वांनी दिलेल्या सल्ल्यानुसार भरपूर पाणीसुद्धा पित आहात, तरीही… चेहरा कोरडा पडतो आहे का? हिवाळ्यामध्ये थंड हवेपासून त्वचेचे रक्षण करायचे असेल तर नुसते घरात बसून, पाणी पिण्यासोबतच स्कीन केअरसुद्धा महत्वाचे आहे. प्रत्येक त्वचेच्या प्रकारानुसार म्हणजे तेलकट, कोरडी अशा प्रकारच्या त्वचेनुसार त्याची काळजी घेणे आवश्यक असते. तुमच्या त्वचेला उपयुक्त असलेले मॉइश्चराइजर जर तुम्ही वापरलेत, तर त्याने त्वचा मऊ मुलायम होईल. जर त्वचा कोरडी असेल तर त्याला पोषण देणारे, हायड्रेट करणारे मॉइश्चराइझर वापरावे. त्वचा तेलकट असल्यास त्वचेवर हलके आणि तेलाचा अंश नसणाऱ्या मॉइश्चराइझरचा वापर करावा.
परंतु, काहींची त्वचा ही कोरडीसुद्धा असते आणि तेलकटसुद्धा. अशा त्वचेला ‘कॉम्बिनेशन स्कीन’ असे म्हणतात. मग लोकांनी काय बरं करावं? अशा त्वचेसाठी हायपोआलेरजेनिक [Hypoallergenic] आणि सुगंध नसलेली उत्पादने हे उपाय आहेत. त्यासोबतच सनस्क्रीन लावणेदेखील फायद्याचे ठरू शकते. आपली त्वचा नक्की कशी आहे हे समजून घेऊन मग त्यावर मॉइश्चरायझरचा वापर केल्याने, त्याचा अधिक चांगला परिणाम होत असतो.
हेही वाचा : डोळ्याखाली काळी वर्तुळे अन् चेहरा थकल्यासारखा दिसतोय? त्वचेची काळजी घेतील ‘हे’ पाच घरगुती फेस पॅक, पाहा
“हिवाळा हा सर्वांनाच हवाहवासा असतो. परंतु, या गार हवेमुळे अनेकांना वेगवेगळ्या त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागत असतो”, असे डीकंस्ट्रक्ट अँड रूटकॉसच्या [Deconstruct & RootCos] संस्थापक आणि सीईओ, मालिनी अदापुरेड्डी यांचे म्हणणे आहे.
हिवाळ्यात आणि प्रदूषणाच्या परिणामाने त्वचेवर कोणकोणते परिणाम होतात?
१. त्वचा कोरडी होणे
हिवाळ्यात त्वचा कोरडी होत असते, परंतु घरात जर हीटिंग मशिन्स असतील तर त्यामुळे त्वचेतील कोरडेपणा अधिक प्रमाणात वाढतो.
२. त्वचा खरखरीत होणे
मॉइश्चरायझरचा वापर न केल्याने, त्वचा खरखरीत होते व कधीकधी त्वचेची सालंदेखील निघू शकतात.
३. खाज सुटणे
थंड हवा आणि त्यामध्ये गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचेमध्ये नैसर्गिकरित्या असणाऱ्या तेलाचा अंश निघून जाऊन त्वचा कोरडी पडून शरीराला खाज सुटते.
४. संवेदनशील त्वचा
काहींच्या त्वचेला कोणतेही वातावरण चालत नाही. उन्हाळ्यात अशा व्यक्तींच्या अंगावर पुरळ उठते, तर हिवाळ्यातदेखील बोचऱ्या थंडीचा त्यांना सामना करावा लागतो.
५. त्वचा लालसर होणे किंवा चिडचिडी होणे
हवेमध्ये अचानक होणाऱ्या या बदलाचा त्रास शरीराला होतो. त्यामुळे त्वचा चिडचिडी होते, तर कधी त्यावर लालसर चट्टेदेखील येऊ शकतात.
६. त्वचा निस्तेज होणे
थंडीमध्ये आपल्या त्वचेची नीट काळजी न घेतल्याने किंवा व्यवस्थित पोषण न दिल्याने ती निस्तेज होण्याची शक्यता असते.
हेही वाचा : कोरफडीसोबत ‘हे’ पदार्थ मिसळून बनवा घरगुती तेल, केसांची गळती कमी होऊन दाटपणा वाढेल; पाहा ही रेसिपी
वरील सर्व समस्या त्वचेला योग्य प्रमाणात मॉइश्चराइज्ड न केल्याने उद्भवू शकतात. त्यामुळे हिवाळ्यात त्वचा मुलायम, नितळ ठेवण्यासाठी योग्य ते मॉइश्चरायझर लावणे फारच महत्वाचे असते. परंतु, कोणत्या त्वचेसाठी कोणते मॉइश्चरायझर लावावे हे महत्वाचे. स्वतःसाठी मॉइश्चरायझरची निवड कशी करावी यांच्या टिप्स मालिनी यांनी दिल्या आहे त्या पाहा.
१. तेलकट त्वचा
तुमची त्वचा तेलकट असल्यास त्यावर हलके जेल स्वरूपातील मॉइश्चरायझर लावणे फायद्याचे ठरेल. यामध्ये तेलाचा अंश नसतो, त्यामुळे चेहऱ्यावरील कोरडेपणा जाण्यास मदत होईल. सोबतच मुरुमं येण्याचे प्रमाणदेखील कमी होते.
२. कोरडी त्वचा
त्वचा कोरडी असल्यास, त्वचेला सर्वाधिक काळजी घेणारे/हायड्रेशन देणारे मॉइश्चरायझर वापरावे. याप्रकारचे मॉइश्चरायझर वापरल्यास त्वचेला आवश्यक ते पोषण मिळण्यास मदत होते.
३. कॉम्बिनेशन त्वचा
त्वचेच्या कोणत्या भागांवर तेलकटपणा आहे पाहून त्वचेवर हलक्या मॉइश्चरायझरचा वापर करावा.
४. साधारण त्वचा
साधारण त्वचेवर मॉइश्चरायझरचा अतिवापर करू नका. योग्य प्रमाणात मॉइश्चरायझर लावल्याने त्वचेवरील हायड्रेशन, मुलायमपणा आहे तसा राहण्यास मदत होते.
[टीप : वरील लेख मिळवलेल्या माहितीवर आधारित असून, कृपया यास वैद्यकीय सल्ला समजू नये.]