How To Change Gas Cylinder At Home: मुंबईसह अनेक शहरात आता गॅस पाईपलाईन सुविधा सुरु झाली असली तरी अजूनही अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. महिन्याभरात किती सिलेंडरचा वापर केला याची गणितं प्रत्येक गृहिणी जुळवत असते. पण कधीतरी समजा वेळेच्या आधीच गॅस सिलेंडर रिकामा झाला की खर्चापासून सगळे आकडे डोळ्यासमोर डोलू लागतात. एकीकडे या आकड्यांचा विचार करताना पुढचा विचार डोक्यात येतो तो म्हणजे आता नवीन गॅस सिलेंडर जोडायचा कसा? वर्षानुवर्षे किचनमध्ये काढूनही अनेकदा गॅस सिलेंडर बदलून नवा जोडणे हे काम कठीणच वाटते. नकळत झालेली चूकही जीवावर बेतू शकते याची कितीतरी उदाहरणे आपण पाहिली आहेत. आज आपण याच समस्येवर सोपा उपाय बघणार आहोत.

गॅस सिलेंडर संपल्यावर नवीन सिलेंडर जोडताना आपण खाली दिलेल्या सोप्या टिप्स फॉलो करू शकता. यावेळी घाबरून जाण्यापेक्षा सतर्क राहण्याची गरज आहे. इंस्टाग्राम वर @cookdtv या अकाउंटवर याबाबत एक सविस्तर माहिती देणारा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. चला तर या व्हिडिओचं माध्यमातून आपणही या स्टेप्स कोणत्या जाणून घेऊयात..

boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
If Unhappy Take Leave This Company Big Decision
“आनंदी नसाल तर कामावर येऊ नका”, ‘या’ कंपनीचा मोठा निर्णय; वर्षाला मिळणार ‘इतक्या’ दुःखी सुट्ट्या
MS Dhoni removed his helmet when fans asking for it
चाहत्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी धोनीने केले असे काही… एकदा व्हायरल व्हिडीओ पाहाच
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

हे ही वाचा<< Video: भांडी घासताना डब्यांचे तेलकट डाग निघत नाहीत? वास व तेल दोन्ही हटवणारा ‘हा’ सोपा उपाय करा

गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट

जर तुम्ही गॅस सिलेंडरकडे बारकाईने पाहिले तर तुम्हाला A, B, C किंवा D अक्षरांपैकी एक दिसेल. गॅस कंपन्या संपूर्ण वर्ष म्हणजे १२ महिन्यांचे चार भाग (A, B, C आणि D) अशा भागांमध्ये एक-एक ग्रूप तयार करतात. A गट – जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च अशा प्रकारे अन्य तीन गटातही विभागणी केली जाते. जर तुमच्या गॅस सिलेंडरवर D-२०२२ लिहिलेले असेल, तर याचा अर्थ हा सिलेंडर डिसेंबर २०२२ मध्ये संपला आहे.

हे ही वाचा<< Video: १५ मिनिटात तयार करा पोह्याचा जाळीदार दावणगिरी डोसा; पीठ आंबवण्याची कटकटच नाही

दरम्यान गॅस सिलेंडर जोडण्याशिवाय वापरताना सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे. तुम्ही गॅस सिलेंडरचा पाईपही दरवर्षी बदलत राहायला हवा. न वापरताना गॅस चुकूनही सुरु ठेवू नका. बाहेर जाताना, झोपण्याच्या आधी गॅस सिलेंडर तपासण्यास विसरू नका.