Potato Hack for Car and Bike: पावसाळा म्हटलं की एकीकडे हिरवीगार निसर्गसंपदा, धबधब्यांचा धुरळा आणि थंडगार वाऱ्याची मजा, तर दुसरीकडे घसरणारे रस्ते, साचलेलं पाणी, सिग्नलचे बिघाड, चिखलाचा त्रास आणि अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढलेलं! या काळात गाडी चालवणं म्हणजे खरंच एक मोठं जोखमीचं काम. विशेषत: गाडीच्या काचांवर सतत साचणारं पाणी आणि आरशांवर थेंब टपक्यांनी जमा होणारं धुकं… यामुळे समोरचं दृश्य अस्पष्ट होतं आणि अपघाताचा धोका दुप्पट वाढतो. वायपर फिरवूनही समस्या कायम राहते.

पण जरा थांबा! या सर्वात एक भन्नाट जुगाड आहे, जो तुमचं आयुष्य अक्षरश: वाचवू शकतो… आणि तोही तुमच्या स्वयंपाकघरात लपलेला! होय, एका साध्या बटाट्याने तुमची गाडी पावसाळ्यातील सर्वात मोठ्या समस्येतून मुक्त होऊ शकते.

कल्पना करा, तुम्ही बाईकवरून, कारने पावसाळी सहलीला निघाला आहात. पाऊस मुसळधार कोसळतोय. पुढचं काहीच दिसत नाही, आरशांमधून दिसणाऱ्या मागच्या गाड्या पूर्णपणे अदृश्य झाल्यात. अशा वेळी अपघात होण्याची शक्यता प्रचंड असते आणि नेमकं याच वेळी ‘बटाटा जुगाड’ तुमच्या मदतीला धावून येतो.

कसं करायचं ते पाहा

१) फक्त एक बटाटा घ्या आणि तो अर्धा कापा.
२) त्याचा काप काचेवर व आरशावर गोल फिरवून घ्या.
३) निदान ३० सेकंद तो व्यवस्थित फिरवा.
४) त्यानंतर दोन मिनिटे बटाट्याचा रस तसाच सुकू द्या.
५) आणि मग पाहा जादू, काचांवर पाणी टिकतच नाही!

हो, अगदी खरं आहे! इन्स्टाग्रामवरील Carki Kaksha या अकाउंटवर शेअर झालेला हा व्हिडीओ लाखोंनी पाहिला आहे. अनेकांनी स्वत: हा प्रयोग करून पाहिला आणि परिणाम जबरदस्त मिळाल्याचं सांगितलं. काचेवर एकदा बटाट्याचा लेप दिला की पावसाचं पाणी काचेवर जमा न होता सरळ खाली घसरून जातं, त्यामुळे गाडी चालवताना समोरचं दृश्य अगदी क्रिस्टल क्लिअर दिसतं.

यातला सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचा जीव वाचतो, कारण अपघात टाळले जातात. त्याचबरोबर गाडी दुरुस्तीसाठी होणारा खर्च, विम्याचा त्रास, वेळेचा अपव्यय या सगळ्यांपासून तुम्ही दूर राहता. एका छोट्या बटाट्याने इतका मोठा बदल घडू शकतो यावर विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे.

येथे पाहा व्हिडीओ

पावसाळ्यातील तुमची ड्रायव्हिंग सेफ आणि थ्रिलिंग दोन्ही करण्यासाठी हा जुगाड जरूर करून पाहा. पुढच्या वेळेस बाईक, कार किंवा स्कुटी घेऊन बाहेर पडा, त्याआधी किचनमधून एक छोटासा बटाटा सोबत घेऊन जाणं विसरू नका.