उच्च रक्तदाब ही एक ‘सायलेंट किलर’ म्हणजेच शांतपणे शरीरावर परिणाम करणारी गंभीर समस्या आहे. ही स्थिती दीर्घकाळ नियंत्रणात न राहिल्यास हृदयरोग, झटका(स्ट्रोक), यकृतासंबधत आजार आणि इतर गंभीर आजारांचे कारण ठरू शकते. अति मीठाचे सेवन, ताणतणाव, वाईट आहार सवयी, खूप जास्त वजण, धूम्रपान, आणि निष्क्रिय जीवनशैली हे उच्च रक्तदाबाचे प्रमुख घटक आहेत.
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी शरीर सक्रिय ठेवणे, ताण कमी करणे आणि आहारातील मीठ कमी करणे आवश्यक आहे. यासहआहारात काही महत्त्वाचे व्हिटॅमिन्स समाविष्ट केल्यास नैसर्गिकरीत्या रक्तदाब कमी करता येते.
व्हिटॅमिन सीचे सेवन का आहे महत्वाचे?
कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक डॉ. ग्लॅडिस ब्लॉक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनानुसार, आहारात व्हिटॅमिन सी चा समावेश केल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो.
व्हिटॅमिन सी म्हणजे अॅस्कॉर्बिक अॅसिड, जे काही फळे आणि भाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. हे पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन असून शरीरात नैसर्गिकरीत्या तयार होत नाही, त्यामुळे ते आहारातून किंवा सप्लिमेंटच्या माध्यमातून घ्यावे लागते.
हे व्हिटॅमिन शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढून पेशींना नुकसानापासून वाचवते, इम्यून सिस्टीम मजबूत करते, स्किन आणि कोलेजनचे निर्माण करते, तसेच रक्तवाहिन्यांची लोच टिकवून ठेवते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये नायट्रिक ऑक्साइडची पातळी वाढते आणि रक्तदाब नैसर्गिकरीत्या कमी होतो.
रक्तदाब नियंत्रणासाठी व्हिटॅमिन सी युक्त हे ४ भाज्या आहारात घ्या
१. लिंबू (Lemon)
लिंबू हा व्हिटॅमिन सी चा सर्वोत्तम स्रोत आहे. दररोज लिंबू पाणी किंवा लिंबू रस घेतल्याने रक्तवाहिन्या लवचिक व स्वच्छ राहतात. लिंबूमधील अँटिऑक्सिडंट्स धमन्यांमध्ये जमा झालेले टॉक्सिन आणि कोलेस्ट्रॉल कमी करतात. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि उच्च रक्तदाब नैसर्गिकरीत्या कमी होतो.
२. टोमॅटो (Tomato)
टोमॅटोमध्ये पोटॅशियम, लाइकोपीन आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.पोटॅशियम शरीरातील अतिरिक्त सोडियम बाहेर टाकते, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो. लाइकोपीन हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून धमन्यांमधील सूज कमी करतो. दररोज कच्चा किंवा थोडासा शिजवलेला टोमॅटो खाल्ल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि रक्तदाब संतुलित राहतो.
३. पेरू (Guava)
पेरूमध्ये भरपूर पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. नियमित पेरू खाल्ल्याने रक्तवाहिन्यांची टिकून राहते आणि अतिरिक्त मीठ शरीरातून बाहेर टाकले जाते. यामुळे रक्तदाब नैसर्गिकरीत्या कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
४. भोपळ्याचा रस (Bottle Gourd Juice)
भोपळ्याचा रस रक्तदाबसाठी अत्यंत लाभदायक आहे. यात असलेले पोटॅशियम आणि फायबर शरीरातील सोडियमचे प्रमाण संतुलित ठेवतात. दररोज ताज्या भोपळ्याचा रस घेतल्याने रक्तप्रवाह सुधारतो, उच्च रक्तदाब कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य टिकून राहते.
नियमित व्हिटॅमिन सीयुक्त आहार, योग्य वजन, ताणावर नियंत्रण, आणि संतुलित जीवनशैली यामुळे रक्तदाबावर नियंत्रण ठेवता येते. औषधांवर अवलंबून न राहता, नैसर्गिक पद्धतीने शरीर निरोगी ठेवणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे.
