लग्नसराईचा माहौल सुरू झाला आहे. पण १५ डिसेंबर २०२१ पासून मल मासामुळे पुन्हा एकदा विवाहांना ब्रेक लागणार आहे. त्यानंतर २०२२ मध्ये जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून पुन्हा सनई वाजू लागेल. जर तुम्हीही लग्न करणार असाल तर जाणून घ्या २०२२ च्या सर्व १२ महिन्यांत लग्नासाठी कोणते आणि किती शुभ मुहूर्त आहेत? याशिवाय काही शुभ दिवस असतील ज्या दरम्यान अक्षय्य तृतीया सारख्या दिवशी लग्न मुहूर्ताशिवाय करता येईल. ३ मे २०२२ रोजी होणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लग्न करणं खूप शुभ मानलं जातं.

Rahu Shukra Yuti in meen rashi
विपरीत राजयोगामुळे दहा दिवसांमध्ये ‘या’ तीन राशींचे बदलणार नशीब , मिळणार गडगंज पैसा
heavy traffic jam for two hours in dombivli
डोंबिवली दोन तासांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडीत; रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना फटका
Malavya Rajyog 2024
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तयार होणार शुभ राजयोग; ‘या’ ४ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
Race for immersion on Rangpanchami in the five rahadis of the Peshwa era
नाशिकमध्ये रहाडींमध्ये डुंबण्याची चढाओढ यासाठी…

२०२२ वर्षातील विवाह मुहूर्त

२०२२ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत विवाहसोहळ्यांचा मुहूर्त असणार आहे. या दरम्यान ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे महिने राहतील, ज्यामध्ये चातुर्मासामुळे लग्नाचा मुहूर्त नसेल.

आणखी वाचा : Vivah Panchami 2021: ‘या’ दिवशी लग्न करणारे लोक खूप दुःखी जीवन जगतात, याचे खास कारण पुराणात सांगितले आहे

जानेवारी २०२२: २२, २३, २४ आणि २५ जानेवारी २०२२ रोजी लग्न करणे शुभ राहील.

फेब्रुवारी २०२२: ५,६,७,९,१०,११,१२,१८,१९,२० आणि २२ फेब्रुवारी २०२२ रोजी लग्न करणे शुभ राहील.

मार्च २०२२: मार्च २०२२ मध्ये लग्नासाठी फक्त २ शुभ मुहूर्त आहेत. या महिन्याच्या ४ आणि ९ तारखेला लग्न करणे शुभ राहील.

एप्रिल २०२२: १४, १५, १६, १७, १९, २०, २१, २२, २३, २४ आणि २७ एप्रिल २०२२ रोजी लग्न करणे शुभ राहील.

मे २०२२ : मे २०२२ मध्ये २, ३ (अक्षय तृतीया), ९, १०, ११, १२,१५,१७, १८, १९, २०, २१, २६, २७ रोजी लग्न करणे शुभ राहील.

जून २०२२ : जून २०२२ मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त १, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १३, १७, २३ आणि २४ तारखेला असेल.

जुलै २०२२ : जुलै महिन्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त ४, ६, ७, ८ आणि ९ असेल.

नोव्हेंबर २०२२: नोव्हेंबर २०२२ मध्ये, विवाहासाठी २५, २६, २८ आणि २९ तारखेला शुभ मुहूर्त आहे.

डिसेंबर २०२२ : डिसेंबर २०२२ मध्ये लग्न करण्यासाठी १, २, ४, ७, ८, ९ आणि १४ तारखेला शुभ मुहूर्त असेल.

आणखी वाचा : Chanakya Niti: करिअरमध्ये यश मिळवायचं असेल तर चाणक्य नीतिच्या या ५ गोष्टी लक्षात ठेवा

लग्नासाठी शुभ दिवस आणि तारीख

धर्म आणि ज्योतिष शास्त्राप्रमाणे लग्नासाठी शुभ मुहूर्त आणि शुभ योग सांगितले आहेत. त्याचप्रमाणे लग्नासाठी शुभ दिवस आणि शुभ तारखाही सांगण्यात आल्या आहेत. या दिवशी आणि तारखांना लग्न करणे खूप शुभ असते. यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते. पती-पत्नीचे भाग्य वाढते.

आणखी वाचा : Wedding Tips : लग्नाआधी तुमच्या जोडीदाराबद्दल या पाच गोष्टी आवर्जून जाणून घ्या, आयुष्य सुखी होईल

ज्योतिष शास्त्रानुसार सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे लग्नासाठी सर्वात अनुकूल मानले जातात. तर मंगळवार हा विवाहासाठी अशुभ मानला जातो. त्याचप्रमाणे द्वितीया तिथी, तृतीया तिथी, पंचमी तिथी, सप्तमी तिथी, एकादशी तिथी आणि त्रयोदशी तिथी विवाहासाठी खूप शुभ आहेत. तसेच अभिजीत मुहूर्त हा विवाहासाठी सर्वात शुभ आहे. याशिवाय गोधुली बेलामध्ये लग्न करणे उत्तम.