सणासुदीच्या काळानिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि विक्री वाढण्यासाठी मोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांना विविध ऑफर दिल्या जात आहेत. अशातच व्हिवो कंपनीने आपल्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने व्हिवो वाय 12, व्हिवो Y91 आणि व्हिवो Y91i या तीन मोबाईलच्या किंमती कमी केल्या आहेत.
व्हिवो वाय 12 या फोनची किंमत एक हजार रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे हा फोन आता १० हजार ९९० रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय व्हिवो वाय Y91 हा फोन किंमतीतील कपातीसह ८ हजार ९९० रुपयांमध्ये, तर व्हिवो ९१आय हा फोन आता केवळ ७ हजार ४९० रुपयांना खरेदी करता येऊ शकणार आहे.
व्हिवो वाय १२ फीचर्स –
६.३५ इंचाचा डिस्प्ले (रिझॉल्यूशन ७२० X १५४४), वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले, पाठीमागे ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप (१३, ८ आणि २ मेगापिक्सलचे कॅमेरे), फिंगर प्रिंट सेंसर आणि सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा
आणखी वाचा : Apple iPad 2019 : ‘या’ तारखेपासून भारतात सुरू होणार विक्री, किंमत किती?
व्हिवो वाय ९१ –
६.२२ इंचाचा Halo फुल व्ह्यू डिस्प्ले, डिस्प्लेच्या टॉपवर ड्यू ड्रॉप नॉच, ४,०३० एमएएच क्षमतेची बॅटरी, पुढील बाजूला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तर पाठीमागे ड्युअल कॅमेराचा सेटअप आहे. फोनच्या मागे १३ मेगापिक्सलचा आणि २ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. ड्युअल सीमच्या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कार्ड स्लॉट आहे. दोन स्लॉट सीमसाठी व एक स्लॉट मायक्रोएसडी कार्डसाठी आहे.
व्हिवो वाय ९१ आय –
६.२२ इंचाचा एचडी डिस्प्ले, वॉटर ड्रॉप नॉच, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३९ ऑक्टा-कोर प्रोसेसर, ४,०३० एमएएच क्षमतेची बॅटरी, २ जीबी रॅम सह दोन इंटरनल स्टोरेजचा पर्याय आहे. फोनमध्ये एवन ड्युअल रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सल देण्यात आला आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेरा फेस अनलॉक सपोर्ट करणारा आहे.