Health Benefits Of Walking: आरोग्य तज्ञांनी सांगितलं की, शरिर सुंदर, स्वस्थ आणि सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम करावा, चालत राहावं. व्यायाम करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, पण कोणत्या वयोगटातील व्यक्तींनी किती चालावं? याची सविस्तर माहिती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चूकीच्या दिशेनं चालत आहात बरं का! अर्थांत तरूण, प्रौढ आणि ज्येष्ठ मंडळी या वयोगटातील व्यक्तींनी किती चालावे? यावर संशोधन केले असता, आश्चर्यकारक माहिती पुढं आली आहे जी, वाचून तुम्हाला सुध्दा तुमची चूक लक्षात येईल. चला तर जाणून घेऊया.

स्वीडनच्या युनिर्व्हसिटी ऑफ काल्मरच्या रिसर्च नुसार

हेल्थ एक्सपर्ट यांच्या सांगण्यानुसार, चालण्याचे अनेक फायदे आहेत. सुर्योदयाला स्वच्छ वातावरणात चालणे हा अनेक रोगांवरचा रामबाण उपाय आहे. पटापट चालण्याने ब्लड सर्क्युलेशन उत्तम होते.कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवता येतं. मसल्स टोन फिट राहण्यास मदत होते. त्याचबरोबर अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. आणि विषेश म्हणजे, वयानुसार व्यक्तीने चालणे ठेवले तर वाढलेल्या वजनाला कंट्रोलमध्ये ठेवता येते. बीपी आणि हृदयाच्या रोगांवर नियंत्रण ठेवता येते.

तरूणांनी किती चालावं ?

स्वीडनच्या युनिर्व्हसिटी ऑफ काल्मरच्या रिसर्च नुसार ६ ते १७ वयोगटातील मुले जितकी चालतील तितका अधिक फायदा त्यांना होतो. या वयात ‘मुलांनी’ जवळपास १५ हजार पावले चालणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर ‘मुलींनी’ १२ हजार पावले चालणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. १८ ते ४० वयोगटातील पुरूष आणि महिलांनी एका दिवसांत १२ हजार पावले चालावं. हे काळजीपूर्वक करत राहिल्यास आरोग्य सुदृढ राहाते.

(हे ही वाचा : तुमची मुलं एक मिनिटही मोबाइल सोडत नाहीत का? मग ५ सोप्या ट्रिक वापरून सोडवू शकता ही वाईट सवय )

प्रौढांनी किती चालावं ?

प्रौढ अवस्थेत पदार्पण करतांना आरोग्याविषयी व्यक्तीला अधिक काळजी घ्यायला लागतो. चाळीशीनंतर अनेक आरोग्याशी संबंधीत समस्या उद्भवतात. त्याचबरोबर या अवस्थेत वजन वाढण्याची दाट शक्यता असते. मग या गटातील व्यक्ती चालतात फिरतात व्यायामाकडे लक्ष देतात. मात्र, किती चालावं हे माहित नसल्याने प्रकृती साथ देत नाही. या वयात प्रौढांना एका दिवसात ११ हजार पावले चालणे गरजेचे आहे. तेव्हाच त्यांना फायदा होऊ शकेल. तर पन्नाशीनंतर जवळपास १० हजार पावले चालणे अत्यंत गरजेचे असते.

जेष्ठ मंडळींनी किती चालावं?

साठीनंतर जेष्ठ मंडळी आरोग्याविषयी अधिक जागरूक असतात. त्यांच शरिर त्यांना पाहिजे तसं साथ देत नाही. मात्र, या वयात फक्त चालणं महत्वाचं नाही तर उत्साहाने चालणं महत्वाचं आहे. जेष्ठांना आपलं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी ८ हजार पावले चालणे महत्वाचे असते.

वरिल वयोगटातील व्यक्तींनी वयोमानानुसार सातत्याने चालत राहिलात तर आपलं आरोग्य अधिक सुंदर, स्वस्थ आणि सुदृढ होणार, यात काही शंकाच नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप:वरील लेख हा माहितीपर आहे यास वैद्यकीय सल्ला समजू नये)