Cucumber And Pineapple Juice: निरोगी आहार आणि पुरेसे पाणी पिणे केवळ तंदुरुस्त राहण्यासच मदत करीत नाही, तर तुमची त्वचाही चमकदार बनवते. अनेक लोक चमकदार त्वचेसाठी विविध रसायनयुक्त सौंदर्य उत्पादने वापरतात. परंतु, त्यामुळे तुमच्या त्वचेचे दीर्घकाळापर्यंत नुकसान होते. आपला आहार आपल्याला निरोगी आणि चमकदार त्वचेला मदत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. जर तुम्ही आरोग्यदायी आहाराचे पालन केले नाही, तर त्याचे दुष्परिणाम तुमच्या त्वचेवर दिसून येतील. अनेक पदार्थ आणि ज्यूस आहेत; जी निरोगी त्वचा मिळविण्याच्या प्रक्रियेस गती देऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ज्यूसबद्दल सांगणार आहोत. काकडी आणि अननसाच्या ज्यूसचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करू शकता. हे बनवणेही सोपे आहे, या ज्यूसच्या सेवनाने तुमची त्वचा चमकण्यास मदत होईल.

निरोगी त्वचा मिळविण्यात काकडी कशी मदत करते?

काकडीत ९६ टक्के पाणी असते. त्यामुळे काकडी आपल्या त्वचेला हायड्रेटिंग बनवते. काकडीमध्ये भरपूर पोषक घटक, खनिजे व जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे तुमची त्वचा निरोगी ठेवण्यास मदत मिळते. काकडी तुमच्या त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. काकडीमध्ये क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते आणि त्यात अँटिऑक्सिडंट्सही असतात. ही बाब त्वचेसाठी अधिक फायदेशीर ठरते. हायड्रेशनच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी आणि खडबडीत होते. तुमच्या त्वचेला श्वास घेण्यासाठी हायड्रेशन अत्यंत महत्त्वाचे आहे. पाण्याचे प्रमाण जास्त असणे ही त्वचेला हायड्रेट करण्याची क्षमता असणारी बाब काकडीमध्ये आहे.

निरोगी त्वचा मिळविण्यासाठी अननस कसे मदत करते?

आपल्या त्वचेच्या बाबतीत अननस हे चमत्कारी फळ आहे. कारण- अननसात ब्रोमेलेन नावाचे एन्झाईम असते; ज्यामुळे शरीरातील जळजळ कमी होते. म्हणून तुमच्या आहारात अननसाचा समावेश केल्यास त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास साह्य मिळू शकते.

हेही वाचा >> Milk Vs. Ragi: दूध की नाचणी? कॅल्शियमचे प्रमाण जास्त कशात आहे? पोषणतज्ज्ञांनी दिलं उत्तर

काकडी आणि अननसाचा रस घरी कसा बनवायचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काकडी आणि अननसाचा रस बनविण्यासाठी तुम्हाला फक्त पाच घटकांची गरज आहे. ब्लेंडरमध्ये काकडी, अननस, पुदिन्याची ताजी पाने व लिंबाचा रस एकत्र करा. नंतर त्यात पाणी घालून, छान बारीक करून घ्या. ज्यूस तयार झाल्यानंतर ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालून, तो सर्व्ह करा. हा ज्यूस आजच तुमच्या आहारात समाविष्ट करा.