How To Make Copper Water: तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्यासाठी खूप गुणकारी मानले जाते. आयुर्वेदातही या पाण्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. पण, तुम्हाला ठाऊक आहे का? तांब्यातील पाणी पिणेच नाही तर त्या पाण्याने चेहरा धुण्याने त्वचेला अनेक फायदे होतात. जर हे पाणी रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवले आणि सकाळी उठल्यानंतर त्या पाण्याने चेहरा धुतल्यास ते चेहरा उजळवते, शिवाय चेहऱ्यावरील डागही कमी करते.
यासाठी काय करावे लागेल?
- तांब्याचे पाणी बनवण्यासाठी पाणी घ्या. हे पाणी खूप थंड किंवा गरम असेल याची काळजी घ्या. ते तांब्याच्या भांड्यात किमान ८ ते १६ तास ठेवा.
सकाळी उठल्यानंतर हे पाणी चेहऱ्यावर हलक्या हाताने फिरवा - तांब्याच्या भांड्यातील पाण्याने चेहरा धुणे त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.
- या पाण्याने चेहरा धुतल्याने पिग्मेंटेशनची समस्या दूर होते. या पाण्याने चेहरा धुतल्याने मेलेनिनचे उत्पादन वाढते, ज्यामुळे पिग्मेंटेशनची समस्या कमी होते.
- तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने तुमचा चेहरा नैसर्गिकरित्या स्वच्छ होतो आणि तुमची त्वचादेखील सुधारते.
- जर तुम्हाला बारीक रेषा आणि सुरकुत्याची समस्या असेल तर तुम्ही या पाण्याने तुमचा चेहरादेखील धुवू शकता.
- या पाण्यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे चेहऱ्यावरील सूज कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत.
- तांब्याच्या पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावर साचलेली घाण साफ होते आणि विषारी पदार्थदेखील निघून जातात.
टोनर म्हणून वापरा
- तांब्याच्या पाण्याने चेहरा धुताना, तुम्हाला हे पाणी तुमच्या चेहऱ्यावर जास्त वेगाने शिंपडण्याची गरज नाही.
- हे पाणी एका ग्लासमध्ये घ्या आणि ते हळूवार तोंडावर ओता.
- यानंतर, तुम्हाला तुमचा चेहरा घासण्याची गरज नाही आणि स्वच्छ कापडाने हळूवारपणे चेहरा पुसून टाका.